पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ जुलई महिन्यांत त्यांना मोठ्या प्रेमानें मानपत्र दिलें. त्या सभेचे अध्यक्ष कूकसाहेब कलेक्टर हे होते. त्यांनीं रावब- हादुरांच्या चांगुलपणाचें फार वर्णन केलें. . ह्यांचा बहुतेक वेळ सार्वजनिक कामांत जातो. खानदे शांत सार्वजनिक काम निघालें कीं त्यांत रावबहादुर पु ढारी असावयाचेच. ह्यांचें ग्रंथावलोकन चांगले आहे. आणखी सध्याच्या स्थितींतल्या बहुतेक विषयांची मा- हिती ह्यांस आहे. राजकीय प्रकरणीं ह्यांचे विचार फार प्रगल्भ आहेत. लोकांत व सरकारांत ह्यांचें वजन फार आहे. मोठमोठ्या सरकारी कामदारांचा समज असा होऊन चुकला आहे कीं, जी गोष्ट खानदेशाला कळवा- याची आहे, ती रावबहादुरांस कळविली ह्मणजे झालें. खानदेशांतील लोकांच्या कल्याणाकरितां हे फार झ टत असतात. संकटांत पडलेल्यास साह्य करण्याविषयीं हे फार तत्पर असतात. हे फार सभ्य, मनमिळाऊ आणि सार्वजनिक कामाची कळकळ बाळगणारे असल्या- मुळे हे सर्व लोकांस फार प्रिय आहेत. सर्व लोक ह्यांना पूज्य मानून फार मान देतात. वकीलीचे कामांत ह्यांनीं लौकिक मिळविला आहे. त्यांतही फौजदारी कामांत ह्यांची ख्याति फार आहे. मुनसफीच्या जागेवर जातां का, असें ह्यांस दोनदां विचारिलें होतें; परंतु त्यांनीं तें नाकारिलें. महाराज तु- कोजीराव होळकर ह्यांनीं सर टी. माधवराव ह्यांना आपले दिवाणाचे जागीं आणविण्याकरितां रावबहादुरांस मद्रा- सेस पाठविलें होतें. व त्यांनी त्यांस इंदुरास आणिलें. होळकर सरकारचे राज्यांत व गायकवाड सरकारच्या रा