Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ दारिद्र्याचें खरें कारण शोधून काढावयाचें, संग्रहालयें स्थापावयाचीं, धं- द्याच्या संबंधाचीं व्याख्यानें द्यावयाचीं, हे तिचे उद्देश आहेत. अमेरिकेंतल्या टेहांटिपेक संयोगिभूमीवर एक चमत्कारिक फूल सां- पडलें आहे. तें सकाळीं शुभ्र असतें, दुपारीं तांबडें होतें, आणि रात्रीं निळें होतें. दुपारीं बारा वाजतां मात्र त्याला वास येत असतो. महाराज धुलीपसिंग हे पारिस शहरांत अर्धागवायु होऊन पडले होते, आणि आपण इंग्रज सरकाराविरुद्ध उठलों तें वाईट केलें, त्याबद्दल क्षमा करावी अशा अर्थाचें एक पत्र त्यांनी महाराणीसाहेबांस पाठविलें होतें. महाराणीसाहेबांनी त्यांस क्षमा केली आहे. आणि ते आतां इंग्लंडास परत गेले आहेत. माजी सर मंगळदास नथूभाई यांचें मृत्युपत्र प्रसिद्ध झालें आहे. त्या- वरून असें दिसतें कीं त्यांचे कांहीं दावे हैकोर्टोत चालले आहेत त्यांचा निकाल झाल्यावर, पांचपासून दाहा लाखपर्यंत रुपये येथील युनिव्हर्सिटीस मिळतील. फार मोठें औदार्य ! ! त्या रकमेच्या निरनिराळ्या स्कालर- शिपा काढून त्या हिंदु विद्यार्थ्यास युरोपांत जाऊन धंदे शिकण्याकरितां द्याव्या असें त्या मृत्युपत्रांत ठरविले आहे. लार्ड रे हे गव्हर्नर असतांना त्यांनी अगदी अखेरीस ठाणें व कुलाबा जि- ल्ह्यांतील लोकांस जंगलाच्या संबंधानें कांहीं सवलती देऊन दोन ठराव केले होते. कुलाब्याबद्दलचा ठराव लार्ड रे येथें असतांनाच प्रसिद्ध झाला; त्यांत असें होतें कीं, ठाण्याबद्दलचा जो ठराव आहे त्यांतल्या ९, १० व १३ कल- मांत ज्या सवलती दिल्या आहेत, त्याच कुलाबा जिल्ह्यांतल्या लोकांस दिल्या आहेत. परंतु त्या सवलती जंगलखात्याच्या अमलदारांस आवडल्या नव्हत्या. ह्मणून त्यांनीं, लार्ड रे हे जातांच, ठाण्याबद्दलच्या ठरावांतील ती कलमें दाबून टाकिलीं, आणि बाकीचा ठराव प्रसिद्ध केला. सरकारी अमलदारांची ही शितापी लोकांच्या लागलीच लक्षांत येऊन त्यांनी मि० ब्राडला यांजकडे दाद मागितली. त्यांनी पार्लमेंटांत याबद्दल प्रश्न विचारिला, परंतु उत्तर चांगले मिळालें नाहीं. वाहवारे सरकाराची लोकहिताविषयी आस्था !! ०