पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ लोक काय बोलतात. लांकडाचे आरसे करूं लागले आहेत. लार्ड क्रास यांनी आपले कौन्सिलबिल परत घेतलें. श्रीमंत सयाजीरावमहाराजांस तृतीय पुत्र झाला. आयुष्मान् भवतु. शेतकऱ्यांचा कायदा आणखी कांहीं जिल्ह्यांस लागू करण्याचा सरका- रचा विचार आहे. रशियाच्या बादशाहाचे वडील चिरंजीव पृथ्वीप्रदक्षिणा करायास लवक- रच निघणार आहेत. "मनुष्यांनी खाण्यासारखा पदार्थ लांकडापासून तयार करितां येईल अशी कल्पना निघाली आहे. गेल्या महिन्यांत भागीरथी नदीस एवढा मोठा पूर आला होता की, तेवढा पूर पूर्वी कधीं आला नव्हता. माहारोग्यांस वेगळें ठेवण्याबद्दलचा कायदा सरकार सध्या करीत नाहीं, हें चांगलें नाहीं. तो रोग पसरत चालला आहे. खोत लोकांच्या हक्कांत हात घालण्याचा सरकारचा विचार दिसतो. ह्मणून, खोत लोकांची मंडळी सरकारास एक अर्ज करणार आहे. ड्यूक आफ् कनाट ह्यांच्या नांवानें एक युद्धकलाशाला स्थापण्याचा वि- चार चालला होता. पण त्यास सरकारची मंजुरी मिळत नाहीं. एक नवीन यंत्र निघालें आहे. त्याच्या पुढे उभे राहून एक पैसा त्यांत टाकिला ह्मणजे तात्काळ आपला एक फोटोग्राफ निघून पुढें येऊन पडतो. मे० बैरामजी जीजीभाई, सी. एस. ऐ., यांनीं गरीब पार्शी लोकां- करितां एक फुकट आंग्लोव्हर्नाक्युलर शाळा घालण्याकरितां साडेतीन लाख रुपये दिले आहेत. पुण्यास एक औद्योगिक मंडळी स्थापन झाली आहे. हिंदुस्थानाच्या