पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
बाबराची पारख

 बाबर हा बादशाहा मोठा चतुर आणि रसिक होता, असे कितीएक ग्रंथकार ह्मणतात.. पण आह्मांला असें वाटतें कीं, त्याला वस्तूची पारख फार कमी होती-किंबहुना मुळींच नव्हती, असें ह्मटलें तरी चालेल. त्यानें स्वचरित्रांत आमच्या ह्या हिंदुस्थानाविषयीं ह्मटलें आहे:- "प्रशंसा करावी असे हिंदुस्थानांत कांहीं नाहीं. सुरेख नाहींत. त्यांस सहवाससौख्य ह्मणजे काय ह्याची कल्पना देखील नाहीं. त्यांस बुद्धि नाहीं, आणि अनेक गोष्टी घडलेल्या पाहून त्यांवरून नियम बसविण्याचें सामर्थ्य नाहीं. त्यांच्या रीतिभाती चांगल्या नाहींत. दुसऱ्यास आवडण्यासारखा गुण त्यांच्यांत नाहीं. भूतदया नाहीं. कलाकौशल्याचा गंधही नाहीं. त्यांची घरें चांगलीं नाहींत, फळफळावळ नाहीं, बर्फ नाहीं, गार पाणी नाहीं, कांहीं नाहीं. त्यांच्या बाजारांत सामानसुमान कांहीं नाहीं. सार्वजनिक स्नानशाला नाहींत, पाठशाळा नाहींत. मेणबत्या नाहींत, शामदानें नाहींत. रात्रीं ल्याहावयाचें किंवा वाचावयाचें ह्मटलें ह्मणजे, घाणेरडा अडाणी लंगोट्या म शालजी जवळ उभा करावा लागतो." एकादें खेडें पाहून हें वर्णन त्यानें लिहिलें असावें. ह्याचा पांचवा वंशज शहाजा- हान बादशाहा ह्यानें दिवाणखास ह्मणून जी अप्रतिम इ- मारत दिल्लीमध्यें बांधिली, तिजविषयीं त्यानें तिच्या भिंतींतच असें खोदिलें आहे कीं, “पृथ्वीवर जर स्वर्ग असला, तर तो हा आहे, हा आहे, हा आहे." पांच पिढ्यांत एवढें जमीनअस्मानाचें अंतर पडलें, आं !