पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९

येऊन दिव्यांचा उजेड जास्त लखलखीत पडतो. दिव्याच्या मागच्या बाजूस अशी तबकडी लाविलेली असली ह्मणजे तो फार लांबून दिसतो, तसा नुसता दिवा दिसत नाहीं, हें पुष्कळांनी पाहिलेंच असेल. असें होण्याचें कारण हैं आहे. नुसत्या दिव्याचे किरण ज्योतीपासून निघून फांकत जातात; त्यामुळें, ते जसजसे लांब जातात तस- तसें त्यांच्या मधलें अंतर जास्त जास्त होत जाऊन, प्रकाशं कमी कमी होतो. ह्मणजे, पाण्यांत दगड टाकिला असतां त्यापासून उत्पन्न झालेले तरंग फांकत फांकत जाऊन ज्याप्रमाणे बऱ्याच अंतरावर दिसेनातसे होतात, त सेंच हें आहे. परंतु मागें तबकडी असलेल्या दिव्याचें तसे होत नाहीं. त्याच्या ज्योतीपासून पुढच्या बाजूस जा णारे किरण फांकत जातात खरे; परंतु मागच्या बाजूचे किरण तबकडीवर पडून परावर्तन पावतात; आणि परावर्तन पावतांना समांतर होतात. आणि याप्रमाणें स मांतर झाल्याच्या योगानें, ते कितीही लांब गेले तरी त्यांच्यामधलें अंतर पहिल्या इतकेंच राहून प्रकाशाचा लखलखीतपणा कमी होत नाहीं. येथें हें मात्र सांगितलें पाहिजे कीं, दिव्याच्या मागें लाविलेल्या तबकड्यांच्या योगानें परावर्तन झालेले किरण सर्वच दिव्यांत समांतर होत नाहींत; घरांत लावावयाच्या दिव्यांच्या तबकड्यांच्या योगानें घरांत मात्र जास्त उजेड पडावा अशी योजना असते. परंतु, आगगाडीच्या पुढचे कंदील, आणि सिग्नलींवर लाविलेले कंदील, यांचा उजेड फार लांबून दिसावयाचा असतो; ह्मणून परावर्तन झालेले किरण समांतर असावे अशी त्यांच्या तबकड्यांची योजना असते.