पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०

असतात. आणि त्यांच्या पुढचीं भिंगें देखील तशींच मुद्दाम केलेली असतात. त्या दिव्यांचे पुढच्या बाजूस जाणारे फांकणारे किरण त्या भिंगांमधून गेले ह्मणजे समांतर होतात. आणि येणेंप्रमाणें त्या दिव्याच्या पुढचे व मागचे किरण हे दोन्ही समांतर होऊन बाहेर पडतात, आणि ह्याच्या योगानें तो दिवा पुष्कळ अंतरावरून दिसतो. दिव्याचे किरण तबकडीवर पडल्यानें कसे समांतर होतात तें पहाः-
 दि हा दिवा आहे; आणि आकृतींत घोटाळा होऊ
क रव ग दि क रव ग घ - त नये ह्मणून तत या तबकडीवर मात्र पडलेले दिक, दि ख, दि ग व दिघ हे किरण दाखविले आहेत. ते.क, ख, ग व घ या जागीं परावर्तन पावून क 'क', ख 'ख', ग'ग' व घ 'घ' असे समांतर होऊन परतले आहेत. या तबकड्यांवर किरण कसे परावर्तन पावतात, तें जाणण्यास किती एक गोष्टी लक्षांत आणाव्या लागतात. तशा आरशांची रचना लक्षांत आणावी लागते. या आरशांचा किरण परावर्तन करणारा पृष्ठभाग वांकडा दिसतो खरा; परंतु, सूक्ष्म विचार केला असतां, तो अत्यंत सूक्ष्म सपाट आरशांनीं झालेला असला पाहिजे, असें लक्षांत येतें. तें कसं तें समजण्यास एक उदाहरण देतों. आगगाडीच्या सडकांची मोठालीं वळणें पुष्कळांनी पाहिलींच असतील. तीं सरळ रेल बसवूनच केलेली असतात; त्यांतला एकही रेल वांकविलेला नसतो. ह्मणून वक्र किंवा गोल आरसे अत्यंत