पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८

पंचवीस कोसांच्या अंतरावर छावण्या असल्या ह्मणजे दरम्यान तारायंत्र ठेवितां येत नाहीं. कारण, शत्रूचे लोक तारा तोडितील अशी भीति असते. ह्मणून अशा प्रसंगी लहान आरशांनीं बातम्या पाठवितात. एक लहानसा आरसा घेऊन तो उन्हांत धरितात, आणि त्याचा कौडसा त्या दुसऱ्या छावणींत पडे असें करितात. त्या दुसऱ्या छावणीतला मनुष्य दुर्बिण घेऊन पाहातच असतो. त्याला ते परावर्तन झालेले किरण दिसतात. मग तो आरसा धरणारा मनुष्य, पूर्वी ठरलेल्या खुणांप्रमाणें, त्या आरशापुढें कमजास्त वेळपर्यंत कागद धरून, अगर तो आरसा उजव्या किंवा डाव्या आंगास फिरवून, कमजास्त बातमी असेल ती कळवितो. ह्या युक्तीनें, उन्ह चांगलें पडलेलें असलें तर, दर मिनिटास १२ शब्द या मानानें बातमी पाठवितां येते. आणि एका छावणीपासून दुसऱ्या छावणीला आणि दुसऱ्या छावणीपासून तिसऱ्या छावणीला, अशी कधीं कधीं शेंकडों मैल बातमी पोंचवितां येते. हें काम चालविण्यास न्हाव्याचा आरसा देखील पुरतो.
 अंतर्वक्र आरसे.- ह्यांचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे त्यांस दिव्यांच्या पाठीमागे लावून, त्या बाजूस जात असलेले त्या दिव्यांचे किरण उलटवून पुढच्या बाजूस आणणे हा होय. आपण आपली समई भिंतीजवळ ठे विली ह्मणजे तिचा भिंतीवर पडलेला उजेड फुकट जातो ह्मणजे, त्याचा उपयोग आपणांस बिलकुल होत नाहीं. परंतु विलायती दिव्यांच्या मागच्या बाजूस तबकड्या लाविलेल्या असल्याच्या योगानें त्यांचा जो उजेड त्या बाजूस पडतो, तो फुकट जात नाही, परंतु पुढच्या बाजूस