पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२

त्याला आपला घात करितां येऊं नये." हें ह्मणणें सगळें खरें नाहीं. अशा पडद्यानें वागणें हें मित्राशीं वागणें हो- णार नाहीं. येथें मित्राशीं असें ह्मटलें आहे, तेथें जनांशीं ह्मटलें असतें, तर बरें झालें असतें. ह्मणजे तात्पर्य असें आहे कीं, आपलीं स्वतःचीं गुह्ये जीं आहेत, तीं, एकादा माणूस खरा मित्र आहे - खरा जीव आहे- अशी खातरी झाल्यावांचून कोणास सांगूं नयेत.
 आणखी ह्यावरून असें होतें कीं, ज्यास आपलीं गुह्यं दुसऱ्या कोणाही जीवाला ठाऊक नाहींत अशीं गुह्ये-क- ळलीं आहेत, तोच आपला खरा मित्र आपण करून घे तला पाहिजे; आणि त्यांत, तो मित्र जर सर्वसमर्थ, स र्वज्ञ, सर्वशक्तिमान असा आहे, तर, हरप्रयत्न करून, आपले सगळें सामर्थ्य खरचून, त्याचें मित्रत्व संपादिलें पाहिजे. असा मित्र कोण, तर परमेश्वर होय. आपलें अमकें एक गुह्य त्यास कळलें नाहीं असें कोण्याच्यानेंही ह्मणवायाचें नाहीं. आपली सगळीं बरीवाईट गुह्यं त्यास कळलेली आहेत. आणि त्यांची बरीवाईट फळें आप- णांस देण्याचें सामर्थ्य त्यास आहे. तेथें लपंडाव चाला- वयाचा नाहीं. इतरांस इतर उपायांनीं संतुष्ट करितां ये- ईल - त्यांचें मन वळवितां येईल; पण परमेश्वर ह्या मित्रास मन पाहिजे- अंतःकरण पाहिजे - ह्मणजे कायावाचामन ह्या सर्वांचें अर्पण पाहिजे. कवि मोरोपंतांनी ह्मटलें आहे:-

आर्या.

 गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा  सत्य प्रेमचि दावुनि सुज्ञे तो विश्वपाल कवळावा. तसा वळवायाचा प्रयत्न भक्तजन निरंतर करीत असतात.