पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ त्यांच्या वाणीमध्यें नेहमीं प्रार्थना ती असते. तुकोबारा- यांनी देवाला ह्मटलें आहे:- - अभंग. तूं माझा माबाप सकळ वित्त गोत तूंचि माझें हित करीं देवा. तूंचि माझा शीव तूंचि माझा जीव तूंचि माझा भाव पांडुरंगा. तूं माझा आचार तूं माझा विचार तूंचि सर्व भार चालवीशी. सर्व भावें मज तूं होसी प्रमाण तैशी तूझी आण वाहात सें. १. २. ३. ४. इतकें ईश्वराशीं तादात्म्य झाल्यावर मग तो मित्र कसा नाहीं होणार? आणि तो मित्र झाल्यावर मग कशाचीही वाण पडावयाची नाहीं. ह्मणून, कोणीं एका अर्वाचीन धा- र्मिक मनुष्यानें जनांस असे सांगितलें आहे की, "तुझी आपल्या मित्रांची याद कराल, तेव्हां तींत देवाचें नांव आधीं प्रथम घाला. " कां कीं, परिणामीं खरा मित्र तो आहे. आरसे. मनुष्याला आपल्या आत्म्याचें स्वरूप जाणण्यास जसें आत्मज्ञान उपयोगी पडतें, तसे आपल्या देहाचें स्वरूप जाणण्यास त्याला आरसा उपयोगी पडतो. पूर्वी आरशांस फार पैसे पडत असत; परंतु आतां ते फारच थोड्या किमतीस मिळत असल्यामुळे, आरसा नाहीं असें घर सांपडावयाचें नाहीं. ह्या आरशांविषयीं येथें कांहीं सांगावयाचें आहे. कोणत्याही पदार्थावर उजेड पडला ह्मणजे त्याचा वि नियोग तीन मार्गीनी होतो. ह्मणजे त्यांतला कांहीं उजेड १२