पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ 6 ह्यांत “व्यसनीं त्यजीना” हा गुण अत्यंत वर्णनीय आहे; तो, मोठेपणाच्या क्रमानें शेवटीं सांगितला आहे. त्यांत मित्रत्वाची शिकस्त झाली आहे. दुधांत पाणी घालून तें सगळें विस्तवावर ठेविलें, तर, पाणी पुढे होऊन आधीं जळतें, दुधास जळूं देत नाहीं, हें खरें आहे. हे ह्या शिकस्तीचें एक मोठें उदाहरण देत असतात. सिसरो ह्या तत्ववेत्त्यानें असें ह्नटलें आहे कीं, "ज- गांतून जर कोणीं मित्रत्व काढून टाकिलें, तर, त्यांनी जगांतला सूर्य नाहींसा केला असें व्हावयाचें आहे. कां कीं, अमरांनीं मित्रत्वापेक्षां अधिक चांगली आणि अधिक आनंददायक अशी दुसरी एकही वस्तु आपणांस दिलेली नाहीं." आणखी, सूर्यास मित्र हें नांव आहेच. 6 ज्या गोष्टीविषयीं सर्व माणसांची एकवाक्यता आहे, ती गोष्ट सर्वोत निर्विवाद असली पाहिजे. सिसरोची आ- णखी एक उक्ति अशी आहे कीं, "इतर वस्तूंच्या किम तीविषयीं लोकांची मतें कशींही भिन्न भिन्न असोत; पण, मित्रत्वाच्या किमतीविषयीं तो मतभेद नाहीं." खरें आहे. मित्रांनीं हित केल्याची उदाहरणें पुष्कळ आहेत. परंतु, मित्रांनीं विश्वासघात केल्याचें उदाहरण कोठें नाहीं. ह्याचा अर्थ असा कीं, मित्र - खरा मित्र - दुर्मिळ आहे. ओळखीचे लोक ते मित्र नव्हत. स्वकार्यसाधू ते मित्र नव्हत. तर, प्लूटार्क असें ह्मणतो की, "असे लोक हे स गळे मित्रत्वाचे दगडी पुतळे आहेत, धातूच्या मूर्ति आ हेत." ह्मणजे, आंत जीव नाहीं. एका ग्रंथकारानें असें हाटलें आहे की, "मित्राशीं तरी अशा रीतीनें वागावें कीं, तो जरी कधीं शत्रु झाला, तरी