पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० बा वाहणें मग नको तुज काळजीतें सारे भिती समजुनी प्रतिकाळ जीतें. लावीं परोपकृति वृक्ष तिजा प्रयासीं सर्वप्रियत्व मग येइल तुजपाशीं माहेर तें सगळिया इथल्या सुखाचें पाहा स्थिरावुनि मना हिततत्त्व साचें. विश्वेश्वरीं भरंवसा चवथा तरू हा निष्ठा धरूनि दृढ लावुनि त्यांत पाहा तेणें चुकेल सगळा भ्रम खेदकारी येईल शांति सुखदायक निर्विकारी. ही लावणी इहपरीं बहुसौख्यदायी साधीं तुला न पडणें मग ऊन कांहीं आला असा अनुभवो शतशा जनांतें येईल कां न मग तो तुज सांग मातें. - ३. योजी हिताप्रति निवारूनि पापकर्मों वर्णी बरेच गुण झांकुनियां कुक में दे आपणास असतां व्यसनीं त्यजीना सन्मित्रलक्षण असें वदतात जाणा. ४. मित्रत्व. शरीरें मात्र भिन्न आणि अंतःकरणें एक, अशा प्रका- रचा जो संबंध मनुष्यांमध्ये असतो, त्यालाच मित्रत्व ह्म- णतात. ह्या संबंधाच्या योगानें मनुष्याची सुखोपभोगाची शक्ति वाढते, आणि दुःखनिरसनाचें सामर्थ्य वृद्धि पावतें. ह्मणूनच, जगामध्यें मित्राचें मोल फार मोठें मानितात. वामनपंडितांनीं ह्मटलें आहे:- श्लोक. ५. १.