पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२९

ह्मणून, त्यास गोळी घालून ठार मारिलें ! ! तेव्हां स- गळ्या राज्यभर मोठा हाहाःकार झाला. 66

साक्रेटिस, एब्राहाम लिंकन, इत्यादि निःसीम ईश्वर-

भक्तांचा शेवट असा भयंकर व्हावा, ह्याचें फार वाईट वाटतें. परंतु, ह्यांत कांहीं तरी परमेश्वरी हेतु असावा, हें खचीत आहे. परंतु, “ अतर्क्य महिमा तुझा गुण हि फार बा हे विधि, श्रुतिज्ञहि ह्मणे तया स्तविल आमुची केंवि धी", असें पंतांनीं ह्मटले आहे, तेथें इतर पामरांचा काय पाड ? तथापि, परमेश्वर कधीं कांहीं वाईट करीत नाहीं, करतो तें सगळें चांगलें करितो, अशी निष्ठा ध रून, आणि एब्राहाम लिंकनाच्या नांवाचें अभिनंदन करून आह्मी हें चरित्र येथें समाप्त करितों.

हृदय हा बाग आहे.

श्लोक. आहे तुझें हृदय उत्तम बाग मोठा हा पीकतां तुज कशासहि बा न तोटा होवोनियां ह्मणुनि तूं चतुरस्र माळी लावोनि त्यांत सुतरूंस तयांस पाळी. सत्यद्रुम प्रथम लाव तयांत आधीं तो वाढतां चुकवितो सगळ्या उपाधी त्याभोंवतीं इतर सद्गुणपादपांचें येतें अपाप पिक सांगति सुज्ञ साचें. संतृप्ति हा तरु दुजा हटकोनि लावीं आनंदवृत्ति मग तूं सहजीं वरावी १. २.