पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८

संस्थानांनीं ह्याच प्रकारचे ठराव करून बंडाचा झेंडा उ भारला. त्यांनीं आपल्या स्वतःकरितां एक स्वतंत्र प्रेसि- डेंट नेमून काम चालविलें. नंतर कांही दिवसांनी त्यांस आणखी चार संस्थानें मिळाली. ह्या गोष्टी घडून आ- ल्यामुळे लिंकनास त्यांशीं युद्ध करावयास उभें राहाणें भाग पडलें. उभय पक्षांचीं पुष्कळ मोठमोठी युद्धे झाली. आणि शेवटी एब्राहाम लिंकनाच्या पक्षाला यशप्राप्ति हो- ऊन, बंडावलेलीं संस्थानें शरण आलीं, आणि त्याच्या ह्मणण्याप्रमाणें, युनैटेडस्टेट्सचे तुकडे न होतां, गुलाम- गिरीचा अगदीं अंत झाला. इ. स. १८६३ ह्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेस एब्राहाम लिंकन यानें एक जाहिरनामा काढून सगळ्या युनैटेडस्टेट्समधली गुलामगिरी समूळ काढून टाकिली, आणि हजारों शिद्दी लोकांस त्यांच्या दुःसह स्थितींतून सोडविलें. याप्रमाणे त्यानें अमेरिकेच्या राज्यपद्धतींतला एक डाग काढून टाकिला.

ह्या लढाईचे पायीं दोन्ही पक्षांचे मिळून सुमारें साहा

लक्ष लोक मृत्यु पावले, आणि सुमारें वीस अब्ज रुपये खर्च झाला ! परंतु शेवटीं सत्पक्षास जय प्राप्त झाला, ह्म- णून सर्वोस मोठा आनंद झाला. आणि त्या सुमारास ए- ब्राहामाची अध्यक्षपणाची मुदत सरत आली होती; ह्मणून त्यास लोकांनी पुनः निवडून, आणखी तीन वर्षेपर्यंत अ ध्यक्ष नेमिलें त्यास पुरते चाळीस दिवस लोटले नाहींत तोंच, तो नाटक पाहात बसला असतां, इ. स. १८६५ ह्या व र्षाच्या एप्रिल महिन्याच्या १४ व्या तारखेस, विलकोस बूथ ह्या नांवाच्या मनुष्यानें, पराजित पक्षाच्या गौरवार्थ