पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२९

स्थानाकरितां कायदे करणारी एकएक मंडळी वेगळी असून, सर्व संस्थानांस लागू व्हावयाचे कायदे करण्याक- रितां कांग्रेस ह्मणून सभा आहे. ह्या कांग्रेस सभेच्या दोन शाखा आहेत. सेनेट आणि हौस आफू रिप्रिझेंटेटिव्हज सेनेटशाखेत, प्रत्येक संस्थानाची कायदे करणारी मंडळी दोन दोन सभासद निवडून पाठविते. आणि हौस आफ् रिप्रिझेंटेटिव्हजमध्यें, प्रत्येक संस्थानांतल्या एकवीस व र्षांच्या वरच्या वयाच्या पुरुषांनी, लोकसंख्येच्या मानानें निवडून पाठविलेले सभासद असतात. इ. स. १८४६ ह्या वर्षी इलिनाइस संस्थानाच्या लोकांनी एब्राहाम लिं- कन ह्यास बहुमतानें हौस आफू रीप्रिझेंटेटिव्हज सभेमध्यें आपला प्रतिनिधि निवडून पाठविलें, आणि पुढे इ. स. १८५४ ह्या वर्षी त्यास सेनेट सभेचा सभासद निवडिलें. - •

युनैटेड स्टेट्समध्यें गुलामगिरी पुष्कळ वर्षीपासून चालू

होती. आणि ती विशेषेकरून दक्षिणेकडच्या संस्थानांत फार चालली होती. उत्तरेकडच्या संस्थानांत ती मु ळींच चालू नव्हती. तरी, गुलाम बाळगणाऱ्या मंड- ळीचा भरणा कांग्रेससभेमध्यें पुष्कळ असल्यामुळे वेळो- वेळीं त्यांस अनुकूल असे कायदे कांग्रेसमध्ये झाले होते. परंतु गुलामांकडून काम घेण्याच्या पद्धतीमुळें दक्षिणेक- डच्या संस्थानांच्या संपत्तीवर फार वाईट परिणाम झाला होता. कारण, जबरीनें घेतलेलें काम कधीही चांगलें होत नाहीं, आणि ह्मणून अशा रीतीनें ज्या देशांत काम करून घेतात त्या देशाची भरभराट कधींही होत नाहीं. इ. स. १८३० ह्या वर्षापासून उत्तरेकडच्या संस्थानांची फार भ रभराट झाली होती, परंतु दक्षिणेकडचीं संस्थानें जशाचीं