पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४

त्याला एकविसावें वर्ष लागल्यावर तें सगळे कुटुंब इलिनाइस संस्थानांत येऊन राहिलें. नंतर तो आपला निर्वाह, स्वतंत्रपणें, लोकांची कामेधामें करून करूं लागला. आणि त्यास का- मेंही पुष्कळ मिळत चाललीं; कां कीं, तो प्रामाणिकपणाचा प्रत्यक्ष पुतळा होता. एके वेळीं तो आपल्या धन्याचा माल विकण्याकरितां न्यूआर्लीन्स शहरीं गेला होता; तेथें शेत- कामावर लाविलेली शिद्दी गुलामांची एक टोळी त्यानें पाहिली. त्या गुलामांच्या पायांत बिड्या असून, त्यांचे धनी त्यांस चाबकांखालीं मारीत होते, व इतर रीतीनें छळीत होते. तें पाहून एब्राहामाच्या मनांत गुलामगिरी- विषयीं जो तिटकारा उत्पन्न झाला, तो त्याच्या देशांत पुढें मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणण्यास फार उपयोगीं पडला. पुढे कांहीं दिवस दुकानदाराचें, कांहीं दिवस पो- स्टमास्तरचें, व कांहीं दिवस सर्व्हेअरचें, असें काम केल्यानंतर एब्राहाम इतका लोकप्रिय झाला कीं, इ. स. १८३४ ह्या वर्षी लोकांनी त्याला इलिनाइस संस्थानाच्या कायदे करणाऱ्या मंडळीचा सभासद निवडलें. नंतर त्याने कायद्याचा विशेष अभ्यास करून वकिलीची परीक्षा दिली, आणि इ.स. १८३७ ह्या वर्षी स्प्रिंगफील्ड येथें स्थायिक होऊन वकिलीचा धंदा चालविला. तें काम त्यानें फार सचोटीनें चालविलें आणि त्याच्या बुद्धीचा प्रकाश विशेष पडून, तो कोणी मोठा महात्मा आहे, असे सर्वोस वाटू लागले. हिंदुस्थानांत हिंदुस्थानांत ज्याप्रमाणें इलाख्याइला- आपल्या ख्यांनी वेगळीं कायदेकौन्सिलें असून, सगळ्या हिंदु- स्थानास लागू व्हावयाचे कायदे करण्याकरितां सुप्रीम कौन्सिल आहे, त्याप्रमाणें, युनैटेडस्टेट्सच्या प्रत्येक सं-