पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६

तशींच राहिलीं होतीं. बाहेरच्या देशांतले हजारों लोक उत्तरेकडच्या संस्थानांत जाऊन राहात; दक्षिणेकडे कोणी जाईना. ह्या सगळ्याचें कारण शाहाण्या लोकांच्या लक्षांत येऊन चुकलें होतें, आणि कितीएक दृढनिश्चयी लोकांनी दक्षिणेंतली गुलामगिरी नाहींशी करण्याबद्दल

विड

ाच उचलला होता. त्यांपैकी एब्राहाम लिंकन हा

एक होता. त्याला सेनेटचा सभासद नेमिलें त्या वेळेस कांग्रेसमध्यें गुलामांच्या व्यापाराविषयीं आणि गुलामगिरी राहू द्यावी किंवा न राहू द्यावी ह्याविषयी मोठा वाद चा- लला होता. गुलामगिरी कायम ठेवावी, असें ह्मणणारे लोक पुष्कळ होते. कां कीं त्यांच्या व्यापारांत त्यांस पु- प्कळ पैसा मिळत होता, आणि माणसांस गुरांढोरांप्रमाणें वागवून त्यांकडून पाहिजे तें काम करून घेतां येत होतें. आणखी ह्याच्या विरुद्धपक्षाची मंडळी-ह्मणजे गुलाम- गिरी अगदीं नसावी असें ह्मणणारी मंडळी फार लहान होती. तींत एब्राहाम लिंकन हा होता. तो उत्कृष्ट वक्ता झाला होता. आणि दृष्टांतद्राष्टांतांनीं दुसऱ्यास निरुत्तर करण्याची कला त्यास फार छान साधली होती. त्यामुळे त्याच्यापुढे त्याच्या प्रतिपक्ष्यांची मात्रा चालेना. त्या- च्याशीं वाद करतांना ते अगदीं वेडावून जात असत. इतक्यांत संस्थानांचा नवा प्रेसिडेंट निवडण्याची वेळ आली; आणि इ. स. १८६० ह्या वर्षाच्या नोवेंबर महि- न्यांत एब्राहाम लिंकन ह्यास, बहुमतानें, प्रेसिडेंट निवडिलें. तेव्हां त्याच्या प्रतिपक्ष्यांच्या पायांची आग मस्तकास च ढली; आणि तो, आपल्या महत्पदावर विराजमान होण्या- करितां, वाशिंग्टन शहरास जायास मार्गस्थ झाला, तेव्हां,