Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२३

ह्या वर्षी जन्मला. परंतु तेथें त्याच्या आईबापांचा प्रपच बरोबर चालेना; ह्मणून तीं इ. स. १८१६ ह्या वर्षी इंडि- याना संस्थानांत येऊन राहिलीं. तेथेंच एब्राहाम लिंकन ह्याचें सगळं बाळपण गेलें. वसाहत करणाऱ्या कुटुंबाला किती त्रास भोगावा लागतो, तें वर सांगितलेंच आहे; त्यावरून, एब्राहामास लहानपणीं किती कमी शिक्षण मिळालें असेल, तें ध्यानांत येईल. तरी, केंटुके संस्थानांत असतांना त्याच्या आईबापांनीं त्याला व त्याच्या बहिणीला एका दोन कोसांवरच्या शाळेंत घालून, थोडेंबहुत लि- हिणेंवाचणें शिकविलें होतें. परंतु आपलें ज्ञान वाढवि- ण्यास त्याला स्वतः फार श्रम करावे लागले. तो लांकडाच्या फळीवर कोळशानें लिहीत बसे, आणि दुसऱ्या लोकांची पत्रे लिहून देई. ह्याच्या योगानें त्याचें अक्षर घटलें, आणि त्याला मजकूर जुळून लिहितां येऊं लागला. वाचणारा जबरदस्त होता. त्याची फार आवडतीं पुस्तकें ह्मटलीं ह्मणजे ख्रिस्ती धर्मशास्त्र, इसाबनीतिकथा, यात्रिकक- मण, आणि जार्ज वाशिंग्टनाचें चरित्र, हीं होतीं. तीं त्याला बहुतेक तोंडपाठ झालीं होतीं. तो

एब्राहाम आंगानें चांगला सुदृढ होता. साधारण तीन

मजुरांचें काम तो एकटा करीत असे. त्यानें एके वेळीं एका प्रसिद्ध मल्लास चीत केलें होतें. सोळा वर्षांचा अस तांनाच तो साहा फूट चार इंच उंच झाला होता. तो आपलें निर्वा- एब्राहामाची बुद्धि चांगली होती. हाचें काम संभाळून पुष्कळ अभ्यास करी. तो आपल्या सोळाव्या वर्षी, सुताराचें काम करीत असतांना, वर्तमान- पत्रांत सामाजिक आणि राजकीय विषय लिहूं लागला.