पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२२

हें परमार्थसंबंधाचें आहे. त्याची प्रत्यक्ष प्रतीति ज्यांस पटते ते खरोखर मोठे भाग्यवान होत. परंतु, ह्या सिद्धांताची थोडीशी प्रतीति साधारण ऐहिक व्यवहारांत देखील येते. तिचीं उदाहरणें इतिहासांत पुष्कळ आहेत. त्यांत रंकाचा राजा झाल्याची उदाहरणे आहेत. त्यांत एब्राहाम लिं- कन ह्याचें उदाहरण विशेष वर्णनीय आणि बोधपर आहे. कां कीं, त्याला राजा करण्याच्या कामांत, त्याच्या प्रार- ब्धापेक्षां त्याच्या सद्गुणांची कर्तबगारी इतकी अधिक स्पष्ट दिसून येते की, त्याच्या चरित्राच्या विचारांत बिचाऱ्या दैवास कोठें जागा आहे की नाहीं, ह्याचा संशय वाटतो. असें जें त्याचें उत्तम चरित्र आहे, तें आह्मी येथें थोड- क्यांत सादर करितों. -

नवीन देशांत जाऊन ज्या लोकांस वसाहत क

रावी लागते, त्यांना किती कष्ट भोगावे लागतात, आणि किती संकटांत पडावें लागतें, ह्याची कल्पना फारच थोड्या लोकांस असेल. चांगली जमीन निवडून काढून तिच्या भोंवतीं कुंपण घालणें, तिच्या वरचीं लहानमोठीं झाडें तोडणें, आपल्या आसयाकरितां झोंपडें बांधणें, जमीन नांगरणें, पेरणें व कापणें, आणि निर्वाहाकरितां शिकार करून आणणें, ह्या सर्व गोष्टी त्या माण- सांना स्वतः हातांनीं कराव्या लागतात. सुमारें शंभर वर्षीपूर्वी अमेरिकेतल्या स्वतंत्र संस्थानांच्या पश्चिम भागांत वसाहत फार कमी झालेली होती. तेव्हां पुष्कळ कुटुंबे त्या भागांत वसाहत करण्याकरितां संस्थानांत हार्डिन ह्या प्रांतीं एक कुटुंब जाऊन राहिलें होतें; त्या कुटुंबांत एब्राहाम लिंकन हा इ. स. १८०९ जात. ह्याप्रमाणें केंटुके