पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ लोक काय बोलतात. पुढची राष्ट्रीय सभा कलकत्त्यास भरावयाची. मि० वर्डस्वर्थ यांस युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर नेमिलें. चांगली निवड झाली. नामदार ग्ल्याडस्टन साहेब मि. ब्राडलांच्या बिलास अनुकूल मत देतील असा रंग आहे. लेडी डफरिन फंडांतून ठेवलेल्या वैदिणींच्या हातून गेल्या वर्षात दोन लक्ष बायकांस साह्य मिळालें. बंगाल्यांतल्या कितीएक शहरांत धंदे शिक्षणाच्या लहान लहान शाळा स्थापित होत आहेत. मुंबई इलाख्यांत मांद्य कां ? मुंबईच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षांतले परीक्षक निवडण्यांत घोटाळा होत असतो, त्याबद्दल शोध करण्यास सिनेटनें एक कमिटी नेमिली आहे. बाबू सुरेंद्रनाथ बानर्जी सुमारें दोन महिने विलायतेस होते; तितक्यांत त्यांनीं सुमारें ३०० मैल प्रवास करून ३० व्याख्यानें दिलीं. पुष्कळ. राष्ट्रीय सभेच्या संबंधानें उद्योग करण्याकरितां जी मंडळी इकडून वि लायतेस गेली होती, ती सगळी परत आली आहे. तिकडे कार्यसिद्धीची आशा आहे. डचूक आफ कनाट हे इकडील कारकीर्दीच्या हकीकतीचा एक ग्रंथ छा- पून प्रसिद्ध करणार आहेत. त्यांतलीं चित्रें डचेस आफ कनाट ह्या आपल्या हातानें काढणार आहेत. मिस फासेट, ह्मणजे स्व० वा० फासेटसाहेब यांची मुलगी, ही, कें- ब्रिज येथें गणितशास्त्राच्या विषयांत दरसाल मोठी परीक्षा होत असते, तींत सर्वोत, पुरुषांच्या पेक्षांही, वर आली ! शाबास ! ! सध्या पुण्यास गणेशखिंडीतल्या सरकारवाड्यांत दर पंधरवड्यास नाच होत असतात ! ! पैसा लोकांचा आणि चैन युरोपियन लोकांची ही कारकीर्द ऐषआरामाची होणार असें वाटू लागले आहे.