पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० कोणी दोघे जर्मन लोक रसायनशास्त्र संबंधाचे प्रयोग करीत असतांना त्यांना इतक्या दुर्गधीचा एक पदार्थ सांपडला आहे की, त्यांच्या घरापासून पाव मैलाच्या अंतरावरचे लोक त्या दुर्गंधीविषयीं तक्रार करूं लागतात ! ! या सालच्या सिव्हिल सव्हिंस परीक्षेत एकंदर ४५ उमेदवार पसार झाले. पैकीं पांच एतद्देशीय आहेत. त्यांत एक मुसलमान आहे व चार हिंदू आहेत. त्यांपैकीं रा० रा० माडगांवकर हे इकडचे आहेत. तिघे बंगाली बाबू आहेत पैकीं एकजण मनमोहन घोस ह्यांचे चिरंजीव आहेत. नामदार ग्ल्याडस्टन ह्मणाले, “इंग्लंडापासून जसजसें दूरदूर जावें तसतसे तेथले लोक इंग्रजी भाषा चांगली चांगली बोलतात, हें विलक्षण आहे. फ्रा- न्सांत इंग्रजी भाषा फार वाईट बोलतात; त्यापेक्षां जर्मनींत चांगली बोल- तात; त्यापेक्षां रशियांत चांगली बोलतात; आणि हिंदुस्थानांत त्यापेक्षां चांगली - सर्वोत उत्तम-फार चांगला उच्चार करून बोलतात.” मोठें भूषण आहे. - नार्वे आणि स्वीडन देशांत, दारू पिण्याची चटक लागलेल्या लोकांस तुरुंगांत टाकितात; आणि त्यांस दारूंत दोन तास भिजवून ठेविलेली भाकर खाऊं घालतात. पहिल्या दिवशीं ती त्याला चांगली लागते; दुसऱ्या दि वशीं थोडी वाईट लागते; तिसऱ्या दिवशीं अधिक वाईट लागते; याप्रमाणें होतां होतां त्याला त्या भाकरीचा तिटकारा येऊन दारूचाही तिटकारा येतो ! ! आमचेकडे असें करून पाहिले पाहिजे. क्षयरोगाचे एक प्रकारचे सूक्ष्म जीवंत पिंड असतात; ते आंगांत भि- नले ह्मणजे क्षयरोग होतो. तसे पिंड जर सशाच्या आंगांत भिनविले तर त्याला तो रोग होऊन तो मरतो. परंतु त्या पिंडांनीं कुत्र्याचें कांहीं होत नाहीं. या सिद्ध गोष्टींवरून, कांहीं पाश्चिमात्य विद्वानांनीं, ते पिंड भिनलेल्या सशाच्या शरीरांत कुत्र्याचें रक्त घालून पाहिलें. तो त्यांना असें दिसून आलें कीं तो ससा पुढें न मरतां चांगला झाला. त्र्याचें रक्त माणसाच्या आंगांत घालून क्षयरोग हटवितां येईल अशी त्यांची कल्पना आहे ! ज्ञानाचा प्रभाव विलक्षण आहे ! या प्रयोगावरून, कु-