पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ भोजनाच्या वेळीं, मेजवान मंडळीने यजमानाचें स्तुतिस्तोत्र अतिशयित केलें. तें ऐकून, आपण कृतकृत्य झालो असें मानून, तो अत्यानंदानें डोलूं लागला. तें पाहून एक मा र्मिक मेजवान त्याजकडे वळून नम्रतेनें ह्मणाला, "अहो, पण हा आपला आनंद चिरस्थायी होण्यास ह्या इमारतीचा एक दरवाजा बुजविला पाहिजे." यज० – काय ह्मणतां ? दरवाजा बुजविला पाहिजे ! तुमच्या बोलण्याचा अर्थ तरी काय ? दुसरा एक मेजवान- अर्थ कशाचा त्यांत ? ते वेडे आहेत. कांहीं तरी बोलतात. - यज० – होय. मला तसेंच वाटतें. पण अहो, तुझी कोणता दरवाजा बुजविला पाहिजे ह्मणतां, सांगा तरी पाहूं. पहिला मेजवान - सांगायाचें काय? आपला आ- नंद चिरस्थायी होण्यास स्वतः आपण चिरस्थायी झालां पा- हिजे की नाहीं ? तर, आपले प्रेत स्मशानांत नेण्यास ह्या मं दिराच्या बाहेर ज्या दरवाजानें काढतील, असें तुह्मांला वा- टत असेल, तो दरवाजा बुजविला पाहिजे. नव्हे काय ? - तिसरा मेजवान — अहो, असा दरवाजा बंद के- ल्यानें मृत्यु टळेल काय ? दरवाजा बंद करणें हें माण- साच्या हातीं आहे, पण मृत्यु टाळणें हें माणसाच्या हातीं नाहीं. कोणाला किती आनंद झाला, तरी त्याचा शेवट झालाच पाहिजे; आणि माणसाला मृत्युमुखी पडलेंच पाहिजे. हें ऐकून, त्या श्रीमंत गृहस्थाच्या अंतःकरणांत प्रकाश पडला; त्याची वृत्ति तेव्हांपासून अगदी बदलली; आणि तो नेहमीं परमार्थाकडे दृष्टि ठेवून वागूं लागला.