पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ अमळ बरी झाली तों दुसऱ्या एका शहरचा वेढा उठवीत असतां, ती इंग्लिश लोकांच्या हातीं सांपडली. तिला सो- डविण्याचा प्रयत्न फ्रेंचलोकांनीं केला नाहीं. ती चेटकी आणि पाखांडी आहे, असें इंग्लिश लोकांस खचीत वाटलें; आणि त्यांनीं तेव्हांच्या कायद्याप्रमाणें तिला जीवंत जाळून टाकिलें ! प्राण जातां जातां ती ओ- रडून ह्मणाली 'लोक कांहींही ह्मणोत, मीं जें कांहीं ह्म- टलें व केलें तें सर्व ईश्वराच्या प्रेरणेचें होतें." हें वर्त- मान इ० स० १४३१ त घडलें. त्यानंतर फ्रान्सदेशांतल्या इंग्रजी राज्यास उतरती कळा लागली; आणि सन १४५१ ह्या वर्षाच्या सुमारास, एक लहानसें शहर शिवायकरून त्या देशांतल्या इंग्रजी रा ज्याचा लय झाला. ह्यांत चमत्कार एवढाच कीं, सत्रा वर्षांच्या मुलीच्या धैर्यानें फ्रान्सदेशाचें फार मोठें कार्य झालें. पण, त्या दे- शानें तिचें उतराई होण्याचा प्रयत्न केला नाहीं. अशी आहे ! तिला ज्या ठिकाणीं जाळलें त्या ठिकाणीं तिचा एक पुतळा मात्र उभा केला आहे. दुनया कितीही आनंद होवो; शेवट आहे !! जिरार्डी केंपिस ह्मणून एक श्रीमंत, मिजाशी, डौली, आणि आत्मस्तुतीस फारच भुलणारा असा गृहस्थ होता. त्यानें एकेवेळीं एक फार सुंदर भव्य इमारत बांधून, तिच्या वास्तुनिमित्त लक्षावधि रुपये खर्चून मोठ्या मे- जवानीचा थाट केला. तेव्हां तिकडच्या परिपाठाप्रमाणें,