पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ त्या दंग्यामध्यें जोन आफ आर्क हिच्या मानेस एक बाण लागला. तेव्हां, तिला कोणीं असें सुचविलें कीं, कांहीं जादू करून तो बाण परत करावा. तिनें तें न ऐकतां आपल्या हातानें तो बाण उपटून काढिला, आणि ती पुनः समरांगणांत आली. दुसऱ्या एका शहराचा वेढा उठविण्याचा प्रयत्न करीत असतां, जोन आफ आर्क हिला एक मोठा गोफणगुंडा लागला. त्याच्या वेदना सोशीत असतां ती आपल्या भों- वतालच्या मंडळीस ह्मणाली, “माझ्या देशबांधवांनो, भिऊं नका. देवानें शत्रूंस आपले हातीं दिलें आहे." नं- तर लवकरच एक लढाई झाली. तींत बाराशें इंग्लिश लोक पतन पावले, आणि फ्रेंचांस जय प्राप्त झाला. ती एकदां आपल्या घोड्यावर बसली, ह्मणजे बारा बारा तास, कांहीं खाल्ल्याप्याल्याशिवाय, तशीच राहत असे !! झाला. अशा प्रकारें तीन महिनेपर्यंत त्या बाईस जयामागें जय मिळून, बराच मुलूख तिच्या राजाच्या स्वाधीन झाला; आणि तो मोठ्या समारंभानें पुनः सिंहासनारूढ त्या प्रसंगी जोन आफ आर्क ही त्या राजाच्या पायां पडून नेत्रांत प्रेमाश्रु आणून ह्मणाली, “परमेश्व- राचा हेतु पूर्ण झाला आहे !" राजानें, संतुष्ट होऊन, काय पाहिजे तें माग असें तिला झटलें. तेव्हां तिनें एवढेंच मागितलें कीं, "माझ्या गांवास सरकारदेणें माफ असावें." त्याप्रमाणें ती माफी पहिल्या राज्यक्रांतीपर्यंत चालली होती. राजा सिंहासनारूढ झाला, तरी देशांतला दंगा चाल- लाच होता. पारिस शहराला वेढा पडला होता, तो उठ- विण्याचा प्रयत्न करीत असतां, तिला जखम लागली. ती