पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ त्याकडे जावयास निघाली. नंतर तिची आणि फ्रेंच राजाची मुलाखत झाली. पण, तिचे ठायीं खरा साक्षात्कार आहे की नाहीं हें पाहाण्याकरितां, लो- कांनीं राजास, साधारण लोकांसारखा साधा पोषाक करून त्यांत बसविलें, आणि त्यास ओळखून काढण्यास तिला सांगितलें. तें तिनें अगदीं बिनचूक केलें. तेव्हां तिच्या देवमाणुसपणाविषयीं त्यांची खातरी झाली; आणि तेव्हां- पासून तिचें प्रस्थ फारच वाढलें. तेव्हां ती अवघी सत्रा वर्षांची होती. इंग्लिश सैन्याचा पराभव करण्यास जोन आफ आर्क हिच्याबरोबर फ्रेंच राजानें दाहा हजार सैन्य दिलें. त्या- समागमें ती असे. ती पुरुषाचा पोषाक करून, आंगावर पांढरें शुभ्र चिलखत घालून, शुभ्र घोड्यावर बसून पुढें 'चाले. तिच्याजवळ एक तरवार मात्र असे. त्या वेळेस ओर्लिन्स शहरांत हजारों शिपाई होते, आणि वेढा घालणारे इंग्रज लोक फारच थोडे होते. परंतु त्या वेळीं तेथें इंग्रजांचा असा कांहीं दरारा बसला होता कीं, त्या हजारों फ्रेंच शिपायांस बाहेरच्या इंग्रजांवर हल्ला करण्याची छाती हो- ईना. परंतु जोन हिचा वृत्तांत ऐकून त्या इंग्रजांची कंबर अगदीं खचली, आणि त्यांजकडून बिलकुल प्रतिबंध न होतां, ती आपल्या सैन्यानिशीं ओर्लिन्सशहरांत गेली. तेव्हां तिजबरोबर अन्नसामुग्री बरीच होती. ती आंतल्या उपाशीं माणसांस फार उपयोगी पडली. नंतर आंतल्या फ्रेंच सैन्यानें बाहेरच्या इंग्लिश सैन्यावर मोठ्या आवेशानें हल्ला केला. त्यांत इंग्लिश सैन्य पराभव पावून पळत सुटलें, आणि ओर्लिन्सशहर मोकळें झालें.