Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ हात असे. त्याला इ० स० १४०४ ह्या वर्षी एक मुलगी झाली. तिचें नांव त्यानें जोन आफ आर्क असें ठेविलें. ती जंगलांत गुरे राखीत असे. पण ती मोठी धर्मभोळी होती. ती त्या खेड्यांतल्या भजनालयांत जाऊन तासांचे तास परमेश्वरप्रार्थना करीत बसे. ती अगदीं ध्यानस्थ होई, तेव्हां तिला असें भासे की आपणापुढे कोणी देवता प्रगट होतात, आणि आपणाशीं कांहीं बोलतात. त्याविषयींच्या गोष्टी ती त्या खेड्यांतल्या लोकांस सांगे, तेव्हां त्या त्यांस अगदी खऱ्या वाटत. कां कीं, त्यांच्यांत अज्ञान फार भ रलें होतें. इंग्लिश सैन्याच्या धुमाकुळीनें फ्रान्सांतल्या सगळ्या लोकांस दे माय धरणी ठाय झालें होतें. स्वतः जोनच्या आईबापांचें झोंपडें त्यांनीं कितीएक वेळां जाळून टाकिलें होतें. जो तो आपला जीव घेऊन पळत असे. त्या वेळेस सा- धेल त्याप्रमाणें जोन ही जखमी झालेल्या व देशोधडीस लाग- लेल्या लोकांस हरप्रयत्न करून साह्य करीत असे. स्वतः राजाला देखील उभे राहण्यास थारा नाहींसा झाला होता. त्या प्रसंगी ओर्लिन्स ह्या शहराला इंग्लिश सैन्यानें वेढा घा- तला; त्याच्या पायीं आंतल्या लोकांवर मोठें संकट ओढवलें, त्याविषयीं जिकडेतिकडे चर्चा चालली. तेव्हां जोन आफ आर्क हिला अर्से वाटलें कीं, आपला देश महद्दुःखांत पडला आहे; त्यास त्यांतून सोडविण्याकरितां परमेश्वरानें आपणास पाठविलें आहे. हें मनोगत तिनें लोकांत प्रगट केलें. तें त्यांच्या मनांत भरलें. ते तिला भजूं लागले. तिच्या भों- वतीं पुष्कळ लोक मिळाले. आणि ती, बापाचा निषेध न जुमानतां, ओर्लिन्सचा वेढा उठविण्याचा निश्चय करून,