पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ झालेल्या तव्यास जाऊन लागण्यापूर्वीच त्या तव्याच्या धगेच्या योगानें त्या थेंबाच्या खालच्या बाजूस त्याची भराभर वाफ होऊं लागून ती बाजूनें वर जाऊं लागते, आणि तिच्या जोरावर तो अधांत्री राहतो - त्याचा आणि त्या तप्त तव्याचा स्पर्श होत नाहीं. ह्या प्रयोगाव- रून, दिव्य वगैरे जे चमत्कारिक प्रकार भोळ्या लोकांत प्रसिद्ध आहेत, त्यांचा बराच उलगडा होतो. तळत्या ते- लांतून जे लोक पैसा काढून घेतात, त्यांच्या हातावर ह्या- प्रमाणें पाण्याच्या वाफेचें आवरण होत असल्यामुळें ते- लाचा आणि त्या हाताचा स्पर्श देखील होत नसेल. शिशाच्या अगर लोखंडाच्या रसांत हात बुडवून काढणारे लोक युरोपखंडांत आहेत. ते पहिल्यानें आपला हात ओला करून मग त्या रसांत घालतात. सत्रा वर्षांच्या मुलीचा पराक्रम. चारपांचशे वर्षांपूर्वी इंग्लंडांतल्या राजांना असे वाटत असे कीं, फ्रान्सदेश हा आपला आहे, आणि तेथील रा- ज्याधिकार आपल्या हाती असला पाहिजे. त्यावरून इं- ग्लिशांचीं सैन्यें वारंवार फ्रान्सावर हल्ले करीत असत; आणि त्या देशामध्यें उभयपक्षांच्या मोठमोठ्या लढाया होऊन रक्ताचे पूर वाहात असत. त्या धामधूमीमध्यें जोन आफ आर्क ह्मणून एका तरुण स्त्रीनें विलक्षण परा- क्रम करून फ्रान्स देशाला तारिलें. तिची गोष्ट ऐकण्यासा- रखी आहे. फ्रान्सदेशांतल्या डोंगराळ प्रदेशामध्यें डामरेमी ह्मणून एक लहानसें खेडें आहे. तेथें एक गरीबसा शेतकरी रा