पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ योगानें १३६ शेर पाण्याचें उष्णतामान एक अंश वाढ- वितां येतें. ह्या उष्णता गुप्त होण्याच्या क्रियेचा उपयोग आपण पुष्कळ करून घेत असतों. घाम आला ह्मणजे आपण वारा कां घेतों ? आपणांस गार वाटतें ह्मणून. वारा घेत- ल्यानें आपणांस गार कां वाटतें ? वाऱ्याच्या योगानें घामाची वाफ जलद होते, आणि त्याची वाफ होण्यास तींत जी उष्णता गुप्त व्हावी लागते, ती शरीरांतून घेतली जाऊन तें गार होतें, ह्मणून. पाण्याच्या भांड्यावर ओलें फडकें लाविलें ह्मणजे तें गार कां होतें? कारण तेंच आहे. ओल्या फडक्यांतल्या पाण्याची हळू हळू वाफ होत जाते, आणि तींत जी उष्णता गुप्त व्हावी लागते, ती, धातूचें भांडे असल्यास त्या भांड्याच्या द्वारें आणि मडकें असल्यास त्याच्या छिद्रांतील पाण्याच्या द्वारें, त्या पाण्यांतून निघून जाते, आणि पाणी गार होतें. वर ला- विलेल्या ओल्या फडक्यांतील पाण्याची वाफ, मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणीं, लवकर होत नाहीं, नाशिकासा- रख्या रुक्ष हवेच्या ठिकाणी लवकर होते, ह्मणून मुंबई- पेक्षां नाशिकास पाणी फार गार होतें. वाफ होण्याच्या संबंधाची एक चमत्कारिक गोष्ट सां- गून हा विषय संपवितों. एकादा तवा तापवून चांगला लाल करावा, आणि त्यावर पाण्याचा एक थेंब टाकावा; ह्मणजे, तो गरगर फिरूं लागून इकडे तिकडे जाऊं लागतो. तवा जर फार ऊन नसता, तर तें पाणी त्या तव्यावर पडून खतखतून केव्हांच नाहींसें झालें असतें. परंतु आतां तसें होत नाहीं. याचें कारण असे आहे कीं, तो थेंच त्या लाल