पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो जोर त्यांना जर उष्णतेच्या योगानें मिळतो, तर तसा जास्त जोर येण्यास जास्त उष्णतेचा विनियोग झालाच पाहिजे, हे उघड आहे. ह्याच संबंधानें दुसरा नियम असा आहे कीं, ऊन क रण्याच्या साधनाचें उष्णतामान कितीही जास्त असेना, पातळ पदार्थ उकळू लागल्यापासून त्या पदार्थाचें उष्ण- तामान वाढत नाहीं. ह्मणजे, आमचा विस्तव कितीकां तप्त असेना, आमचें पाणी उकळूं लागून त्याची वाफ होऊं लागली, कीं, तें जास्त ऊन होण्याचें बंद होतें; मात्र, त्या पाण्यावर जास्त दाब बसेल असें करूं नये. आतां ह्यावर एक प्रश्न साहजिक निघतो कीं, पाणी उकळू लागल्यावर त्याला आह्मी जी आणखी उष्णता ला- वतों, तिनें तें पाणी जर जास्त ऊन होत नाहीं, तर ती जाते कोठें ? ह्याचें उत्तर असे आहे कीं, पाणी उकळू लागल्यापासून विस्तवाच्या उष्णतेचा विनियोग त्या पा- ण्याचें उष्णतामान वाढविण्याकडे न होतां त्याच्या परमा- णूंमधलें परस्परांचें प्रतिसारण वाढविण्याकडे, ह्मणजे त्यांची एकमेकांस दूरदूर लोटण्याची शक्ति जास्त करण्याकडे होतो. ह्मणजे, त्या जास्त उष्णतेच्या योगानें त्या पाण्याची वाफ होते; आणि ती वाफ त्या पाण्यापेक्षा जास्त ऊन नसल्यामुळे, ती जास्त उष्णता त्या वार्फेत गुप्त झाली आहे असें ह्मण- ण्याचा परिपाठ पडला आहे. ह्याप्रमाणें निरनिराळ्या पदार्थांच्या वार्फेत किती उष्णता गुप्त होत असते ह्याबद्दल शोध केलेला आहे. पाण्याच्या वाफेच्या संबंधानें असें सिद्ध झालें आहे कीं, एक शेर पाण्याची वाफ केली ह्म- णजे तींत जितकी उष्णता गुप्त होते, तितक्या उष्णतेच्या