Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ रून खरे सावध झाले रामदास; ह्मणून त्यांस वंदन असो. ह्यांत सावधान ह्मणणाज्यांची कांहीं प्रतिष्ठा नाहीं. कांकी, तें ते सगळ्यांच्या लग्नांत ह्मणत असतात. पण तें खरो- खर ऐकणारे कायते एक रामदासच निघाले. ते धन्य होत. त्याच धोरणानें आह्मी असें ह्मणतों कीं, उपदेश करणारा - पेक्षां उपदेश ऐकणारा विशेष योग्यतेचा पाहिजे. साधुत्व घेतलें ह्मणजे उपदेश करण्याचा अधिकार येतो. परंतु, उपदेशाप्रमाणे वागण्यास गृहस्थत्व आणि साधुत्व हीं दोन्ही संपादावी लागतात. ह्मणून, प्रपंचांत बोधश्रवणाचा अधिकार संपादणें हें काम फार कठिण आहे. वाफ होणें. - उष्णतेच्या योगानें पदार्थाचें उष्णतामान वाढतें - ह्मणजे ते जास्त ऊन होतात आणि त्या पदार्थातील परमाणूंचें पर- स्परांमधलें प्रतिसारण वाढून त्या पदार्थांचा आकार वाढतो. असा आकार वाढल्याच्या योगानें घन पदार्थ पातळ होतात. आणि पातळ पदार्थांची वाफ होते. आतां ह्या वाफ हो- ण्याविषयीं कांहीं सांगावयाचें आहे. बर्फास उष्णता लाविली ह्मणजे त्याचें पाणी होतें, आणि पाण्याला उष्णतां लाविली ह्मणजे त्याची वाफ होते. ह्यावरून, घन पदार्थाची वाफ होण्यापूर्वी तो पहिल्यानें पा- तळ होतो असे वाटतें. परंतु काही पदार्थांच्या संबंधानें तसे होत नाहीं. कापूर हा पातळ झाल्याशिवाय उडून जातो, ह्मणजे त्यांची वाफ होते. कस्तूरीसारख्या सुगंधी पदार्थाचें असेंच आहे. ऐओडैन नांवाचा एक घन