पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ पदार्थ आहे; त्याला दिव्यावर धरलें ह्मणजे त्याची एक- दम वाफ होऊं लागते. पातळ पदार्थाची वाफ होण्याचे दोन प्रकार आहेत. त्या पदार्थाच्या पृष्ठभागावरच्या परमाणूंची हळू हळू वाफ होत असते, तो पहिला प्रकार; आणि त्या पदार्थाच्या पोटांत वाफ उत्पन्न होऊन वर येते, तो दुसरा प्रकार. ओले कपडे वाळणें, दौतींतली शाई हळूहळू आटणें, हीं वाफ होण्याच्या पहिल्या प्रकाराची उदाहरणे आणि पाण्याखालीं जाळ लावला ह्मणजे त्याला कढ येऊन त्याची वाफ होऊन जाणें हें दुसऱ्या प्रकारचें उदाहरण आहे; याला कढणें ह्मणतात. आहेत. पहिल्या प्रकारानें वाफ होण्याविषयीं ह्मणजे पृष्ठभा- गावर वाफ होण्याविषयीं एक असा नियम आहे कीं, पातळ पदार्थाचा जितका जास्त पृष्ठभाग मोकळा असतो, तितका जास्त पदार्थ वाफेच्या रूपानें निघून जातो. ह्मणजे, पितळींत व चंबूंत तितकेंच पाणी घालून तीं दोन्हीं उघड्यावर ठेविलीं, तर पितळींतलें पाणी लवकर वाळतें. दुसरा नियम असा आहे कीं, ह्याप्रमाणें पृष्ठभागावर उत्पन्न झालेली वाफ जर त्या पृष्ठभागास लागून असलेल्या हवेंत तशीच राहिली, तर आणखी वाफ होण्यास प्रतिबंध होतो; आणि त्या पृष्ठ- भागावरची हवा खेळती असली, ह्मणजे, तेथें उत्पन्न झालेली वाफ वाज्याबरोबर दूर जात असली, तर जास्त वाफ होते. ह्याचा अनुभव आपल्याला पावलोपावलीं आहेच; उदाहर- णार्थ, वाऱ्यावर वाळत घातलेले किंवा वारंवार हालवलेलें चिरगूट लवकर वाळतें. असें होण्याचें कारण हें कीं, को- णत्याही प्रवाही पदार्थाच्या पृष्ठभागावर त्या पदार्थाची