पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ नाहींत, त्यांस त्यांचें मोल, खरोखर आहे त्यापेक्षां पुष्कळ अधिक वाटतें, हें साहजिक आहे. " आणि त्याप्रमाणें वाटतें हें खरें आहे. भलत्याच मोहास वश होउन आपले आयुष्य आणि जीवित व्यर्थ घालवूं नये, ह्मणून ह्या सूचना आहेत. का लाइल हा एक मोठा तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्यानें एके ठिकाणीं मनुष्यास लक्षून लिहिले आहे की, "तूं आपल्या जीवाविषयीं विचार कर. पृथ्वीच्या पाठीवर तूं कितीही जरी नीच आणि लहान आणि हलका असलास, तरी, तुझा जीव ही कांहीं थट्टा नव्हे - तें कांहीं स्वप्न नव्हे तर ती खरोखर मोठी अमोल वस्तु आहे. ती तुझी स्वतःची आहे. तुला अनंतकालच्या परमार्थाचें जें साधन करून घ्यावयाचें आहे, त्यास सगळा आधार काय तो त्याचा एकट्याचा आहे. तर मग, ताज्याच्या गतीप्रमाणें-ह्मणजे जलदी न करितां आणि कधीं न थांबतां - तुझा उद्योग एकसारखा चालूं दे." किती विचार करण्यासारखा उत्तम बोध आहे ! - असा बोध वारंवार कानीं पडतो. पण त्याचा ठसा उमटत नाहीं. “नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें, " असें होतें. ही गोष्ट साधारण माणसांची आहे. खऱ्या विचारी मनुष्यांचा प्रकार कांहीं वेगळा असतो. कविसत्तम मोरोपंत ह्यांनीं रामदासांविषयीं ह्मटलें आहे. जन सावधान ऐसें सर्वत्र विवाहमंगलीं ह्मणती तें एक रामदासें आयकिलें त्या असो सदा प्रणती. ह्याचें तात्पर्य हेंच आहे की, "सावधान" ह्या शब्दाव-