पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दिवसांचा आहे. आणखी, कायदेकौंसलांत, ह्मणजे, आमच्या देशाचे कायदे करणाऱ्या मंडळ्यांत आमच्या लोकांस नेमूं लागले, ह्याचें कारण तेंच आहे. पण, त्यांत एक दोन व्यंगें आहेत, ती काढावयास पाहिजेत.

 पहिलें व्यंग हें कीं, हे आमचे सभासद कमी असतात, त्यामुळे त्यांचें ह्मणणें चालत नाहीं. तें म्हणणे चालण्यास हे सभासद पुष्कळ पाहिजेत. निदान निमे तरी पाहिजेत. ही एक गोष्ट करून घ्यावयाची आहे.

 दुसरे व्यंग हें आहे कीं, हे सगळे सभासद सरकार नेमितें. त्यामुळें ते सरकारचे उपकारबद्ध होऊन,सरकारच्या होस हो देतात; खरें देशाचें हित असतें, त्यागोष्टी त्यांस कळत असल्या, तरी त्या, सरकारास रुचणार नाहींत कीं काय, ह्या भयानें त्यांच्यानें तोंडाबाहेर काढवत नाहींत. आणखी शिवाय, कधीं कधीं कौंसलांमध्ये असे सभासद नेमतात कीं, ते नुसते नांवानें किंवा पैशानें मात्र मोठे असतात, आणि त्यांस राज्यव्यवहार कळत नसतो. अशा सभासदांपासून कांहीं उपयोग होत नाहीं. ह्मणून, चांगले शाहाणे माहीतगार असे गृहस्थ पाहून, त्यांस लोकांनीं निवडावें, आणि त्यांची नेमणूक कौंसलांत व्हावी, असं व्हावयास पाहिजे आहे.

 हीं दोन्ही व्यंगें काढावयास पार्लमेंटाचा कायदा झाला पाहिजे. तो होण्यास हा विषय तेथें कोणीं तरी मोठ्या माणसानें काढिला पाहिजे. तो आतां मि. ब्राडला ह्यांनीं काढिला आहे. त्यांनी ह्याविषयींच्या कायद्याचा मसुदा कामन्ससभेमध्यें सादर केला आहे. त्यावर लोकांत पुष्कळ वादविवाद चालला आहे. विरुद्ध पक्षाची मंडळीही नानाप्र-