पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3. Tar १०५ अपने खैसैकूं दूधमलीदा खुदानामकूं डरता है. खासा पैसा खासा कपडा खासा नाम अल्लाका है देना है तो देना बाबा आगे मौज तुमारी है. वाई हें फकीराचें मागणें स्वार्थदृष्टीचें आहे खरें; पण त्यांत सांगितलेला बोध कांहीं खोटा नाहीं. तारुण्याच्या मदांत द्रव्य जवळ असलें ह्मणजे दिनदुनयां खातरेंत नसते. आ णखी अशा स्थितींतल्या अजाण माणसाच्या वागण्यावरून एकाद्याला असें वाटायाचें कीं, ह्यास जणुं काय वृद्धाप- काल आणि कठिण प्रसंग हे कधीं यावयाचेच नाहींत. लार्ड चेस्टरफील्ड ह्मणून एक फार मोठा नामांकित श्रीमंत गृ- हस्थ इंग्लंडांत होऊन गेला. त्यानें आपलें सगळें आयुष्य उत्तम प्रकारच्या ऐषआरामांत घालविलें. आणि सगळ्या प्रकारचीं सुखें भोगून सोडिलीं; भोगलें नाहीं, असें को- णतेंही सुख सोडिलें नाहीं. परंतु, शेवटीं त्यानें आपल्या ग्रंथांत लिहिले आहे कीं, “ मी सर्व प्रकारचे कामधंदे करून, सर्व प्रकारचीं सुखें भोगून चुकलों • सर्वांचा अनुभव मला आहे. तो असा कीं, तीं सगळीं क्षणभंगुर आणि शेवटीं वाईट वाटतें अशीं आहेत. आणि ह्मणून, तीं मला आतां पुनरपि मिळावयाचीं नाहींत ह्याचें मला मुळींच वाईट वाटत नाहीं. तीं मला नकोत. त्यांची ·- किंमत मला समजली आहे. त्यांत काय आहे, तें मी जाणून आहे. त्यांत कांहीं नाहीं. आतां, तीं सुखें ज्यांनीं भोगिलीं आहे. त्या १. खाण्याकरितां.