पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संती संचरणें असत्पथ महायत्नीं सदा वर्जणें सर्वी नम्रपणें धरोनि ममता श्रद्धा क्षमा वर्तणें. हें साहित्य तुझा प्रपंच सगळा चालावयाला पुरे आणाया तुज तें नको हुडकणें बाजार किंवा पुरें देवानें तुझिया हृदीं सदयते तें चांगलें ठेविलें त्यातें बाहिर काढुनी निजहितीं तूं पाहिजे लाविलें. ऐसें वर्तन ठेवितां धन मिळो वा यो गरीबी किती चित्ताला स्थिरता सदा गमतसे नाहीं तियेला मिती चिंता क्लेश अपाय दूर पळती भीती जणों काय ती आला हा सगळा खरा अनुभवो सुज्ञांस ते सांगती. हा ठेवोनि पुढें प्रतिक्षणि करीं यत्नें असें वागणें देईल प्रभु तूजला सुख नको हें वेगळं सांगणें दीपा लाविलिया प्रकाश नलगे आणावया वेगळा गोडी जाइल काय सोडुनि कधीं काळीं स्वगेहा गुळा. बोध करणें आणि बोध घेणें. ● ३. ४. शिकंदरबादशाहाचा बाप फिलिप राजा हा सिंहासना- रूढ झाला ह्मणजे आपले मागें एक सेवक उभा करीत असे. त्या सेवकाचें काम एवढेच असे कीं, राजा को- पास चढून किंवा धनांध होऊन भलतेंच कांहीं करूं ला- गला ह्मणजे त्याला ह्मणावें कीं, "महाराज, आपणांस म रायाचें आहे. " तें ऐकल्याबरोबर राजा शुद्धीवर येई, आणि आपले काम यथान्याय करी. आणखी आमच्या साधूंच्या कविता पहिल्या तर बहुतेकांचा रोख असाच असतो. तो मनुष्याचे डोळे उघडण्यास फार उपयोगी पडतो. “ प्राण्या राम भजावारे, मनीं गर्व नसावारे " असें