पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ असें करून ठेविलें आहे की, प्रवेशपरीक्षेत जो कायस्थ प्रभु विद्यार्थी पहिला येईल, त्यास त्या रकमेच्या व्याजांतून स्कालरशिप द्यावी. ह्यांत त्यांची आपल्या जातीविषयीं आस्था व्यक्त होते. अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करून, आणि महाराज व इंग्रजसरकार ह्या उभयतांकडून शाबास ह्म- णवून घेऊन, दिवाणबहादुर लक्ष्मण जगन्नाथ हे, दिवाण- गिरीचें काम सोडून, पेनशन घेऊन, आज दोन महिने झाले, घरीं स्वस्थ बसले आहेत; आणि जन्मभर परिश्रम केल्याचें फल-शांतिसौख्य- ते भोगीत आहेत. तें त्यांस पुष्कळ दिवस भोगावयास सांपडो, असें ह्मणून आह्मी हैं स्वल्प चरित्र येथें समाप्त करितों. - प्रपंची मनुष्यास उपदेश. श्लोक. झालें लग्न तुझें यथाविधि तुला आली पहा बायको काल व्यर्थ फिरोनि हिंडुनि अतां वा घालवूं तूं नको संसारास हळू हळू तव खरा आरंभ की जाहला ह्याचा तूं कर बा विचार हृदयीं वेळीं कसा तो भला. संसारास धनाशिवाय दुसरें कांहीं न कामीं पडे तें विद्येविण ना धरेवर कधीं कोणासही सांपडे साधीं यास्तव चांगली जपुनियां विद्या करोनी श्रमा तीची येइल ती स्वैसा मग तुझ्या गेहीं स्वभावें रैमा. सत्यातें भजणें अखंड धरणें उद्योग नानागुणे लोकीं शांतपणे स्वकर्म करणें देणें न कोणा उणें १. बहीण. २. लक्ष्मी. १. २.