पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ सगळी राज्यव्यवस्थासूत्रें लक्ष्मण जगन्नाथ ह्यांच्या हातीं होतीं. त्या मुदतींत त्यांनीं राज्याचा कारभार इतका उत्तम चालविला कीं, त्यांविषयीं कधीं कोठें बोभाट ऐकू आला नाहीं. शिवाय बडोद्यास जितके रेसिडेंट त्यांच्या वेळीं आले, तितक्यांनीं त्यांच्या कामाची वाहवाच केली. गायकवाडी रेलवेवरचा माजिस्त्रेटी अधिकार गायकवाडां- कडेसच राहिला आहे, इंग्रज सरकाराकडे गेला नाहीं, हें फल लक्ष्मण जगन्नाथ ह्यांच्या चातुर्याचें होय. ह्यांचें विश्वासनिधित्व पाहून, संतुष्ट होऊन, इंग्रज सरकारानें ह्यांस दिवाणबहादुर ही पदवी दिली आहे. ह्या दिवाणबहादुरांनीं बडोदेंसरकारचे मुलकीकडील सगळ्या खात्यांचे सगळे नवेजुने कायदे व ठराव एकत्र करवून छापविले. त्यांच्या योगानें राज्यांतलें काम एका पद्धतीनें चालविण्याची मोठी सोय झाली आहे, आणि लो- कांत विश्वास उत्पन्न झाला आहे. ह्यांनीं बडोदेंसंस्थानांतील जमीन महसुलाच्या पद्धतीची चांगली सुधारणा केली. महसूल गोळा करणारे कामदार थोडा पगार घेऊन लोकांवर जुलूम करीत असत. त्यांचा पगार वाढवून त्यांच्या कामावर सक्त देखरेख ठेवण्याची पद्धति सुरू केली आहे. तिच्या योगानें लोकांचा त्रास पुष्कळ कमी झाला आहे, आणि बडोदेसरकारचें उत्पन्न वाढत आहे. ह्यांनीं, पूर्वीच्या राजाच्या कारकीर्दीत बस- लेले पुष्कळ त्रासदायक कर काढून टाकिले आहेत. विद्यावृद्धीकडेही ह्यांचें लक्ष चांगले आहे. ह्यांनीं मुंबईच्या विश्वविद्यालयाकडे पांच हजार रुपये देऊन