पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० लागणार आहे. आपल्या लोकांत एकी असणे फारच महत्वाचें आहे. " हें काजी शाबुद्दीन ह्यांचें ह्मणणे फार लक्षांत ठेवण्यासारखें आहे. ० ह्या पत्रव्यवहारानंतर, इ० स०. १८७४ ह्या वर्षी ल क्ष्मण जगन्नाथ हे नवसारीचे सुभे झाले. त्याच्या अगोदर कांहीं दिवस राज्याची स्थिति सुधारण्याकरितां मल्हारराव महाराजांस हिंदुस्थान सरकारानें कांहीं महिने मुदत दिली होती, आणि ती सरण्याच्या आधींच विषप्रयोगाचें प्रकरण उत्पन्न होऊन, मल्हारराव महाराज पदच्युत होऊन, श्री० सयाजीराव गादीवर बसून, सर टी माधवराव दिवाण झाले होते. त्यावेळेस नवसारीचा प्रांत जमिनीच्या साऱ्यानें अगदीं त्रासून गेला होता. जमिनी जिकडे तिकडे ओसाड पडल्या होत्या, आणि लोकांना काय करावें तें सुचेनासें झालें होतें. अशा प्रसंगी लक्ष्मण जगन्नाथ तिकडे गेले, आणि त्यांनीं जातीनें मेहनत घेऊन जमिनीवरचा सारा चाळीस चाळीस टक्केपर्यंत कमी करून लोकांचा आशीर्वाद संपादिला. तेथें त्यांचें स्मारक ह्मणून लोकांनी "लक्ष्मणहॉल" नांवाची एक इमारत बांधिली आहे. नंतर सन १८७९ ह्या वर्षी त्यांस कडी प्रांताचे आक्टिंग सुभे नेमिलें; तेथेंही त्यांनीं आपलें काम फार चांगलें बजाविलें; तें इतकें कीं, खुद्द महाराजांनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना बडोदें येथें सन १८८३ ह्या वर्षी कायमचे सरसुभे केलें. पुढें, मे. काजी शाबुद्दीन ह्यांच्या कारकीर्दीनंतर ते, इ० स० १८८६ ह्या वर्षी श्रीमंत सयाजीराव महाराजांचे मुख्य दिवाण झाले. त्यानंतर महाराज दोनदां युरो- पांतल्या प्रवासास गेले होते, तेव्हां अडीच वर्षेपर्यंत