Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ पुढें लक्ष्मण जगन्नाथ हे बेळगांव येथें डेप्युटी कलेक्टर होऊन गेले. तेथें त्यांचें काम उत्तम रीतीनें झालेलें पा- हून, सरकारानें त्यांची पुष्कळ वाखाणणी केली; आणि, सरकारचे मुख्य चिटणीस चापमनसाहेब ह्यांनीं त्यांस इ० स० १८७३ ह्या वर्षी सरकारी पत्रांत असे लिहिलें कीं, हिंदुस्थानाच्या वसुलाच्या बाबतींत चौकशी करण्या- करितां हौस आफ कामन्सची जी कमिटी नेमिली आहे, डें साक्ष देण्यास तुझी योग्य आहां. त्याच्या पुढच्या वर्षी, मि. हवेलाक, रेव्हिन्यु कमिशनर, ह्यांच्या शिफारशी- वरून, त्यांस रेव्हिन्यु कमिशनर, उत्तरभाग यांचे इंग्लिश असिस्टंट नेमिलें. ती जागा त्या वेळेपर्यंत एतद्देशीय मनु- प्यास पूर्वी कधींही मिळाली नव्हती. IN-1 , ह्यानंतर, बडोद्यास, मल्हारराव महाराज गादीवर अ- सून, शेट दादाभाई नौरोजी हे दिवाण असतां, तिकडून काजी शाबुद्दीन ह्यांनी लक्ष्मण जगन्नाथ ह्यांस लिहिलें कीं, " शेट दादाभाई ह्यांचे मदतीस येण्यास कबूल करा. आपणां एतद्देशीयांचे आंगीं कोणते गुण आहेत हें प्रगट करण्यास आणि गरीबगुरीबांचें बरें करण्यास ही संधी फार चांगली आहे. आणखी माझी खात्री आहे कीं, शेट दादाभाईसारख्या पुरुषाजवळ तुझी नौकरी आनंदानें कराल." आणखी ह्याच्या पुढच्या पत्रांत त्यांनी त्यांस लिहिलें कीं, " आपल्या दर्जास कमीपणा येणार नाहीं, अशा प्रकारची नौकरी आपणांस पाहिजे आहे. नव्या कारभारी मंडळीस आपण मनापासून साह्य केलें पाहिजे. एकाद्या प्रकरणांत मतभेद पडल्यास मताधिक्य मिळवावें .