Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४७



सन्मानपूर्वक व जयघोषसूचक तोफांची सलामी द्यावी ह्मणूने आज्ञा फर्माविली. त्यामुळें सर्वत्र विजयोत्सव होऊन आनंदीआनंद झाला. शिंदे सरकारच्या 'फुलबाग' येथील प्रासादामध्यें रोषनाई, मेजवान्या व दरबार ह्यांचा थाट उडाला, व शिंदे सरकारच्या अप्रतिम साहाय्याबद्दल सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचे फार फार धन्यवाद गायिले. ह्या प्रसंगी बायजाबाईसाहेब ह्यांचाही योग्य गौरव करण्यांत आला, हें निराळें सांगावयाचे प्रयोजन नाहीं. महाराज जयाजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांचा समावेश 'शिंदे सरकार' ह्या एकाच नांवांत होतो.

 शिंदे सरकारच्या कृपासाहाय्याबद्दल आग्रा येथील दरबारामध्यें हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांनी ता.२ डिसेंबर इ. स. १८५९ रोजी त्यांचा फार सत्कार केला; व त्यांचे कृतज्ञतापूर्वक अत्यंत आभार मानून त्यांस दत्तकाची परवानगी दिली, व त्यांच्यावर अनेक प्रकारच्या मेहेरबान्या करून त्यांस तीन लक्षांचा मुलूख बक्षीस दिला. ह्या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणामध्ये, "शिंद्यांचे राजानिष्ठ व प्रतापशाली घराणें हें अक्षय्य नांदत राहून त्याचा सदैव उत्कर्ष व्हावा अशी सार्वभौम ब्रिटिश सरकारची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, अशी महाराज शिंदे सरकार व त्यांचे प्रजाजन ह्यांनी खात्री बाळगावी[]" असें आश्वासन दिले. ह्यांतील प्रत्येक शब्दच काय, परंतु प्रत्येक अक्षर देखील बहमूल्य रत्नाच्या किंमतीचें असून, त्याची योग्यता वरील जहागिरीपेक्षाही अधिक आहे, असे ह्मटल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं. इ. स. १८५७ च्या बंडामध्यें शिंद्यांच्या घराण्यानें ब्रिटिश सरकारावर केलेले उपकार जसे यावचंद्रदिवाकरौ विसरण्यासारखे नाहींत, तसे हे शब्दही


  1.  1. "Your Highness and all your Highness' subjects may be sure that it is the earnest desire of the paramount power that the loyal and princely house of Scindhia shall be perpetuated and flourish."