पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 126 crop)
भाग ७ वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 126 crop) 2
ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति व बायजाबाईसाहेबांचा वनवास.

 हाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामधील कलह मिटविण्याबद्दल बाह्यात्कारें तरी निदान ग्वाल्हेरचे रेसिडेट मि. क्याव्हेंडिश ह्यांनी पुष्कळ खटपट केली. परंतु तिचा काहींएक उपयोग न होतां, त्यांच्यामधील वितुष्ट अधिकच वाढत गेलें; आणि ता. १० जुलई इ. स. १८३३ रोजीं ग्वाल्हेर येथें उघड रीतीनें बंड झालें. महाराज जनकोजीराव ह्यांनीं ग्वाल्हेर येथील 'वरुण' व 'बहादुर' हे दोन कंपू अगोदरपासून आपल्याकडे अनुकूल करून घेतले होते, व त्यांचे अधिकारी जे शूर पुरभय्ये लोक होते त्यांच्याशीं वचनप्रमाण पक्कें करून, गादीवर बसल्यानंतर त्यांस मोठमोठे अधिकार देण्याचें मान्य केलें होतें. त्याचप्रमाणें महाराजांनी कर्नल जेकब ह्यांस अनुकूल करून त्यांच्या ताब्यांतील कंपू आपल्या मदतीस घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कर्नल जेकब हे स्वतः अनुकूल न होतां, त्यांचे सैन्य मात्र फितलें होतें. ह्याप्रमाणें सैन्याच्या मदतीची चांगली सिद्धता झाली असें पाहून, महाराजांनीं बायजाबाईसाहेबांस राजवाड्यांत कैद करून स्वतःच्या नांवाने द्वाही फिरविण्याचा निश्चय केला. ता. ८ जुलई इ. स. १८३३ रोजीं ते सहज हवा खाण्याचें निमित्त करून कर्नल जेकब ह्यांच्या कंपूमध्यें गेले; व तेथून इशारत करून कांहीं तरी सैन्याची हालचाल करणार, तों त्यांच्या आगमनाची