पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१

अपरिपक्वबुद्धि असल्यामुळें, ग्वाल्हेर दरबारांतील कुटिल व कलहप्रिय लोकांच्या ते ताब्यांत जाऊन, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. तथापि, त्यांच्या ह्या दुर्वर्तनाने हा कलह अधिक विकोपास गेला व त्याचा परिणाम बाईसाहेबांस विनाकारण भोगावा लागला, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. 'एका हातानें टाळी वाजत नाहीं' ह्या व्यवहारांतील ह्मणीप्रमाणें महाराजांच्या दुर्वर्तनामुळें बायजाबाईसाहेबांसही संताप व उद्वेग येऊन, त्यांच्याही हातून क्वचित् प्रमाद घडले असतील; परंतु दोषाचा अधिक वांटा त्यांच्याकडे येतो, असें उपलब्ध माहितीवरून तरी निदान ह्मणतां येत नाहीं.बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 125 crop)