पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००



पत्रव्यवहार बायजाबाईंस कळविल्यावांचून मी पुढें रवाना करणार नाहीं. तुमच्या हे लक्ष्यांत असेलच कीं, तुमची भेट घेण्याबद्दल गव्हरनरजनरलसाहेबांनी बायजाबाईंची परवानगी प्रथम विचारली होती; व तुमच्या भेटीमध्यें जी हकीकत घडली, ती सर्व मागाहून त्यांस कळविली होती. त्यांच्या संमतीवांचून तुमचा व माझा किंवा गव्हरनरजनरलचा व तुमचा खाजगी पत्रव्यवहार होणें अगदीं अशक्य आहे. बाईसाहेबांनीं तुह्मांस जास्त ममतेने वागविण्याबद्दल मी त्यांस सांगावें ह्मणून तुह्मीं जें लिहिले आहे, त्याबद्दल माझें असें सांगणे आहे कीं, तुह्मी जर स्वतःच बाईसाहेबांस आपल्या वर्तनानें संतुष्ट कराल, तर तुह्मांस त्या फार चांगल्या रीतीनें वागवितील. तुह्मी अयोग्य तक्रारी करीत राहाल व भलतेसलते विचार मनांत वागवाल, तर तुमचीं संकटें कमी न होतां, उलट अधिक वाढतील; व आह्मी तुमच्याकरितां बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं. तात्पर्य, तुह्मीं बायजाबाईंस संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; व गव्हरनरजनरलसाहेबांचे शब्द सदोदित नेत्रासमोर ठेविले पाहिजेत."

 ह्याप्रमाणें महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस बायजाबाईसाहेबांच्या मर्जीप्रमाणें व आज्ञेबरहुकूम वागण्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनीही स्पष्ट रीतीने कळविलें. ह्यावरून गव्हरनरजनरल व ग्वाल्हेरचे रेसिडेंट ह्यांस महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन पसंत नसून, त्याचा त्यांनी वारंवार कडक शब्दांनी कसा निषेध केला होता, हे दिसून येतें. अर्थात् या सर्व हकीकतीवरून ग्वाल्हेर येथील तंट्याचे मूळ कारण काय व त्याचा अधिक दोष कोणाकडे येतो, हें चतुर वाचकांस सहज ताडितां येईल. महाराज जनकोजीराव ह्यांचे अल्पवय व


 1. Letter from the Hon'ble Mr. Cavendish to Junkoo Raw Scindiah, in reply to one received from the Maharaja, dated 28th March 1833.