पान:बाबुर.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिंहासनावरून उचलबांगडी बाबुर वैभवागरीच्या गगनचुंबित शिखराला पोंचला होता. तो बादशहा झाला होता आणि आपण वैभवाचा उच्च बिंदु गांठला असे त्यास स्वतःपुरते तरी वाटत होते. पण हा काळ फार वेळ टिकला नाहीं. ती दुपारचीच सावली ठरली. तो पुन्हा एकदा भाग्याच्या उत्तुंग शिखरावरून अधःपाताच्या खोल गर्तेत फेकला गेला. ही आपत्ति त्याने आपल्या हाताने ओढून घेतली होती. बाबुरास सध्यां प्राप्त झालेले ऐश्वर्य पूर्णपणे स्वतंत्र नव्हते. त्यांत थोडे वैगुण्य होते. ते म्हणजे तो समरकंदला राज्य करीत होता तो पर्शियाच्या इस्माइलशहाचा प्रतिनिधि म्हणून. येथपर्यंतही फारसे बिघडले नव्हते. पण याच्यापुढे त्याने समरकंदचा राजा या नात्याने फार मोठी चूक केली. ती म्हणजे त्याने आपला धर्मपंथ बदलला. तो शिया झाला. कारण शहा हा शिया पंथाचा होता. बाबुरसारख्या उदारधी माणसास त्यांत फारसे वावगे वाटले नाहीं; पण हे करण्यांत त्याच्या हातून पर्वताएवढी चूक झाली. या पापाने खणलेल्या खड्डयांतच त्याचे राजेपण गाडले गेले. मुसलमानांची धर्मवृत्ति अत्यंत प्रखर आहे. तिला तोड आज विसाव्या शतकांतही सांपडावयाची नाही. शिया आणि सुनी या दोन धर्ममतांचा उभा दावा, एकमेक एकमेकांना पाण्यांत पहातात. समरकंद, बुखारा वगैरे