पान:बाबुर.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा एकदां समरकंद खश, बुखारा आणि समरकंद या तिन्ही ठिकाणांहून शत्रु पळत सुटला आणि बाबुराच्या सैन्याने त्याचा पिच्छा पुरवून उझबेग लोकांस पार हुसकावून दिले. | समरकंद म्हटल्याबरोबर बाबुर बादशहाच्या सुप्त आकांक्षा दरदरून जाग्या होत. तो, तैमूर, त्याचे साम्राज्य आणि त्या साम्राज्याचा मी सम्राट् अशी त्या विचारांचा परिणति होई. समरकंद हाती येतांच शहाच्या अनुमतीने त्याने समरकंदवा तख्तावर स्वतःस तिस-यांदा राज्याभिषेक करून घेतला. समरकंदने असला अपूर्व समारंभ पूर्वी केव्हांच पाहिला नव्हता. या वेळी सगळीकडे लखलखाट उडाला होता. ध्वजा-तोरणांनी सर्व रस्ते शृंगारण्यांत आले होते. बाबुराचा राज्यारोहण-समारंभ एवढा थाट।चा झाला की, गेल्या कित्येक शतकांत असा समारंभ झाला नाही असे लोक म्हणत होते. ह्या वेळी बाबुराचे वैभव शिगेला पोचले होते. इ. स. १९११ ला बाबुराचा राज्यविस्तार फार मोठा होता. ताशकंद, सैराम प्रांतापासून तारतरी प्रदेशापर्यंत तसेच काबूल, गझनी, हिंदुस्थानची सरहद्द, समरकंद, बुखारा, हिसार, कुनदुश, फना एवढ्या मोठ्या प्रांतावर बाबुराचे राज्य अप्रतिहतपणे चालू होते. या वेळी बाबुरच्या मनांतील हिंदुस्थानाविषयींचे विचार पार मावळन गेले होते. त्याने तैमूरच्या सिंहासनावर सुखाने राज्य करण्याचे ठरविले होते, बाबुरास कृतकृत्य झालेसे वाटत होते. गडी खुषीत होता.