पान:बाबुर.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिंहासनावरून उचलबांगडी ९७ ««««««««««« «««««« « ठिकाणची प्रजा सुनी पंथाची होती. बाबुराने स्वतःच्या धर्मपंथांत केलेला हा बदल त्या लोकांच्या डोळ्यांत सळू लागला. बाबुराने या शिया पंथाची राज-चिन्हें धारण करण्यास सुरुवात केली. शिरस्त्राण त्या पद्धतीचे तो घालू लागला. इतकेच काय पण त्याने नाणेसुद्धां तसे सुरू केले. त्या नाण्यावर इस्माइल शहाचें नांव वर खोदून त्याला गौरवाचे स्थान देण्यात आले होते. त्याच्याखाली बाबुराचें नांव कोरण्यांत आले होते. ते नाणें रोज बाजारांत वापरले जाई. प्रतिक्षणाला ते या हातांतून त्या हातांत जाई, तेव्हां हा फरक झाकून न राहता त्या नाण्यांच्या छन्छनोटाबरोबर छनाने आणि तुमचा राजा शिया आहे, तो काफीर आहे, असा त्या नाण्यांचा छन्छनाट पुन्हा पुन्हा बजावी, तेव्हां लोकांची मने जागृत होऊन त्यांचा बादशहाविषयींचा तिटकारा वाढे, त्याच्याबद्दलची पोटतिडीक निर्माण होई. इतकेच नव्हे तर बाबुराने शिया पंथ काजींच्यावर लादण्याचा प्रयत्न केला. तेव्हां त्यास त्यांच्याकडून जोराचा प्रतिकार झाला. त्याबरोबर त्या काजींस फासावर चढावे लागले. त्यांची डोकी धडावेगळी होऊ लगली. हे प्रकरण इतक्या ‘घाईला आल्याबरोबर बाबुरची सुनी प्रजा त्याच्यावर उलटली. त्यांना बाबुरची ही करणी पाठीत खंजीर भोंसकल्याप्रमाणे विश्वासघाताची वाटली. त्यांना बाबुरापेक्षां शैबानीखान बरा वाटू लागला. कारण तो उघड उघड शत्रु होता आणि त्याची वागणूकही त्या थाटाची होती. तो शत्रु म्हणून बेधडक डोकी मारीत होता. पण हा मुंहमें नाम और बगलमें छुरी असला विश्वासघातकी शत्रु नको असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्याची सर्व सुनी प्रजा त्याच्यावर उलटली. या असंतोषाचा पारा चढतां चढतां इतका चढला की, शेवटी कुलमलीक या ठिकाणी ३ ० ० ० उझबेग लोकांनी त्याच्या ४०० ० ० सैन्याचा धुव्वा उडविला. कोठे चाळीस हजार आणि कोठे तीन हजार ! पण ते सैन्य नव्हतेच, इतका