पान:बाबुर.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ बाबुर mm म्हणजे ती दरी ओलांडून येणें प्राप्त होते. बाबूर हिरातला गेला असतांना काबूलचे राज्य पटकावू पहाणा-या खान मिझोस या स्वारींत मोठे मानाचे स्थान देण्यात आले होते. शत्रूकडील जवळ जवळ एक हजार उझबेग लोकांची रांग सामना देण्यासाठी दरड चढून वर येऊ लागली. त्याबरोबर खान मिझ त्या तुकडीवर चालून गेला. पण उझबेग लोकांनी त्याची दशा केली. या चकमकीत तो कामासच यावयाचा पण ऐनवेळी मदत आली म्हणून तो बचावला. या लढाईत बाबुराने दुसरा एक महत्त्वाचा मनुष्य बरोबर घेतला होता. तो म्हणजे हैदर. हा बाबुराचा मावसभाऊ आणि काबुली कारस्थानांतील त्याचा मावसा महंमद हुसेन मिझ दुघलत याचा मुलगा. हैदर या वेळी वयाने लहान होता, पण त्याने बरोबर येण्याचा हट्ट धरला म्हणून त्याला बाबुराने बरोबर घेतले होते. तो होता म्हणून त्याच्या पठडीतील पुष्कळसे लोक या वारीत होते. | या वेळीं हैदर बाबुराच्या शेजारी होता आणि युद्धाचे अवलोकन करीतः। होता. त्याच्या अंगांत युद्धाचे अवसान भरत होते. पण “ बच्चा, तू लहान आहेस' असे सांगून बाबुर त्यास आवरून धरीत होता. पण त्याच्या लोकांनी मात्र कमाल चालविली होती. खान भिझच्या लोकांना त्याची मदत फार झाली. ह्या लोकांनी शत्रूचा खुद केला. हे लोक बादशहाच्या आसपास बिनी संभाळून होते आणि शत्रूवर तुटून पडून त्याला मार्गे रेटत होते. या हल्लयांत प्रथम याच लोकांनी शत्रूकडील कैदी आणला. त्याबरोबर बाबुर बादशहास अत्यानंद झाला व ह्या विजयानें हैदरचें नांव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल असे तो ओरडला. दिवस बुडू लागला होता आणि अंधःकार समीप ठेपला होता. युद्ध अशा त-हेने चालू होते. अंधःकार गडद होऊ लागतांच गडबड उडाली. उतरंडीवरून आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी शत्रु मागे सरू लागला. त्याबरोबर बाबुरच्या लोकांनी तडाखेबंद रट्टे मारण्यास सुरुवात केली. जोराची कचाकची झाली, त्यासरशीं शत्रूनें कच खाल्ली, त्याचे-पुष्कळ सेनापति पडाव झाले, पुष्कळ लूट मिळाली. दिवसाबरोबर बाबुर चा शत्रूही बुडाला.