पान:बाबुर.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा एकदां समरकंद खिळखिळे झाले होते की, फक्त एकच तडाखा मिळाला की ते कोसळणार होते व या कार्यासाठीच बाबुरास आमंत्रण आले होते. ह्या आमंत्रणाने बाबुरास आनंदानें स्वर्ग ठेंगणा वाटू लागला आणि त्याने या स्वारीवर जाण्याचे ठरविले. पण ही वेळ अशी भयंकर होती की, स्वारीवर जातांनाच मोक्ष व्हावयाचा. हिंवाळ्याची बर्फवृष्टि चालू होती. सर्व मार्ग बफने ओतप्रोत भरले होते. तेव्हा या दिव्यांतून सैन्य नेणे म्हणजे कोणत्या प्रकारच्या यमयातना होत्या त्या बाबुराने एकदां अनुभवल्या होत्या. तो झूर होता. 'पराक्रमी होता. मृत्यूशी खेळ खेळणे ही त्याची करमणूक होती. पण विनाफायदा दानावारीं मरून जाण्याची मात्र त्याची तयारी नव्हती. आतां त्यास यशाची आशा दिसत होती म्हणून तो हिंवाळी हवेचें साहस पत्करून या स्वारीवर निघाला. शैबानीखानाच्या लष्करी सामथ्याची बाबुरास योग्य कल्पना होती तेव्हा घाईघाईने त्याच्याशीं गांठ घालून धोका पत्करण्यास तो तयार नव्हता. शैबानीखान आतां जिवंत नव्हता, पण त्याच्या खास तालमीत तयार झालेले सेनानी या स्वारीत होते. त्यांच्या हालचाली चालू होत्या. जो तो लढाई देण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधीत होता. इस्माइल शहाने धाडलेलें तुर्क लष्कर बाबुरला सामील झाले नव्हते व एकट्याने उझबेग लोकांशीं गांठ घालण्यास तो कचरत होता. शत्रूचे सामर्थ्य अचाट होते. हो-ना करता करतां शत्रूला झुकांड्या देत देत बाबुर झपाट्याने निघाला व त्यानें अबदरा नांवाच्या पर्वतावरील घाटांत चांगली जागा गांठून मोर्चे लावले व तो शत्रूची वाट पहात राहिला. इ. स. १५११ च्या प्रारंभास केव्हा तरी ही लढाई झाली. एक दिवस मध्यरात्रीस अशी आवई उठली कीं, शत्रु आला आणि पाहतात तो शत्रु खरोखरच येत होता. रात्रभर सर्व सेना सामना देण्याची तयारी करीत होती. सूर्योदयाबरोबर टेहळ्यांनी बातमी आणली की, शत्रु तयार आहे. दोन्ही लष्करांत एक मोठी दरी होती, तेव्हां शत्रूशीं गांठ घालावयाची