पान:बाबुर.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा एकदां समरकंद बाबुर आणि स्वास्थ्य या दोन गोष्टी एके ठिकाणी नांदणेच शक्य नव्हते की काय कोण जाणे. विधिलिखित तसे नव्हते. बाबुर आतां जरा स्वस्थतेने राहात होता. दिवसामागून दिवस जात होते, तोच इ. स. १५१० च्या हिंवाळ्यांत एक दिवस खान मिझचे पत्र घेऊन एक जासूद आला. त्याने मोठी आनंदाची बातमी आणली होती. बाबुराचा कर्दनकाळ, बेग लोकांचा हाडवैरी आणि तैमूर वंशाचा मुळापासून छेद करू पाहणारा राक्षस शैवानीखान दुनियेपार झाला होता. त्याचा मृत्यु असा तसा झाला नव्हता तर मर्वी या गांवाच्या शेजारी झालेल्या संग्रामांत मृत स्वारांच्या ढिगा-याखालों गुदमरून तो मेला होता. त्याचे डोके कापण्यांत आले होते. त्याची कवटी सोन्यांत मढवून त्याचा पेला शाह इस्माइल हा रोज पाणी पिण्यासाठी वापरीत होता. जगांत शेरास सव्वा शेर असतो. बाबुरासारख्या पराक्रमी माणसास रणांगणांतून पळ काढावयास लावणाच्या शैबानीखानाचा निकाल लावणारा भेटला. त्याचे नांव शाह इस्माइल. त्याने पर्शियाचे राज्य जिंकले होते आणि तेथे तो राज्य करीत होता, त्याने शैबानीखानास आणि त्याच्या उझबेग लोकांस असा कांहीं जबरदस्त तडाखा दिला की, ते खुरासानहून अमूला व अमूहून कुंदुझला पळत सुटले. त्यांचे सामर्थ्य आतां इतके