पान:बाबुर.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बादशहा। अबदर रझाकने काबूलचे राज्य बाबुरच्या स्वाधीन बिनबोभाट केलें; पण नंतर काही दिवसांनी त्याच्याविरुद्ध एक मोठे बंड झालें. बाबुराच्या शिस्तीचा आणि न्यायी वागणुकीचा त्या रानटी व मस्त लोकांना कंटाळा आला होता. त्यांना मनगटाचे राज्य असावे व ज्याला जसे वाटते तसे त्याला करण्याची मुभा असावी, ही कायद्याची आणि शिस्तीची टुरटुर कामाची नाही असे वाटत होते. तेव्हां बाबुरास उखाड देण्यासाठी अदमासे तीन हजार मोगल सैनिकांनी बंड केले आणि त्यांनी अबदर रझाकला आपला राजा म्हणून घोषित करून धामधूम चालविली, तेव्हां बाबुरास फार त्रास झाला. त्याचे सामथ्र्य त्या मानाने कमी होते. चार-पांच चकमकी झाल्या आणि शेवटी ब-याच धकाधकीनंतर हे बंड थंड झालें. अबदर रझाक याचा त्या बंडाशीं नांवापलीकडे फारसा संबंध नसल्याकारणाने त्याला फारसा त्रास झाला नाहीं. बाबुर या वावटळीतून पार पडला आणि शांतता प्रस्थापित झाली.