पान:बाबुर.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर। maa •wwwwwwwww. हिंदुस्थानचा मार्ग आक्रमीत असतां त्याला अफगाणी टोळ्यांपासून अत्यंत त्रास झाला. हे लोक नंबर एकचे लुटारू, तेव्हां चो-यामान्यांचा त्याच्या सैन्यास फार उपद्रव होई. त्यांची हड्डी नरम करून त्यांच्यावर आपला वचक बसविणे हे काम अत्यंत जिकीरीचे होते. ते करीत करीत बाबुर आपला मार्ग आक्रमीत होता. जलालाबादपर्यंत तो आला असेल नसेल तोंच बातमी आली की, शैबानीखानाशी तह झाला असून तो माघारौं फिरला आहे व त्यापासून पुन्हां उपद्रव होण्याचा संभव नाही. ही बातमी येतांच बाबुरास हायसे वाटले. मोठे प्राणसंकट टळले असे झाले आणि ते । खरेही होते. बाबुराचे हे करणे सकृतदर्शनी स्वार्थीपणाचे दिसते, पण वास्तविक ते तसे नव्हते. त्याने आपल्या जिवाचा बचाव केला, शैवानखानाची आणि बाबुराची गांठ होती तर त्याने त्यास खासच ठिकाणावर ठेविले नसते, केव्हांच यमसदनाला पाठविले असते. तेव्हां त्याने हा धूर्तपणाचा मार्ग पत्करला हे फार चांगलें झालें. हिंदुस्थानावर जाण्याचा बेत तुर्त रहीत करून बाबुर माघारी फिरला आणि पुन्हा काबुलास आला. त्याने स्वतःस बादशहा हे उपपद लावून घेतले. हे नांव धारण करण्यांत बाबुराची महत्त्वाकांक्षा चांगलीच प्रतीत होते. कारण आजपर्यंत कोणीहि हे अभिधान आपणास लावून घेतले नव्हते. बाबुर काबुलास येताच त्याने राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली. ती त्यास कोणत्याही तव्हेचा झगडा न होतां मिळाली, ही गोष्ट मात्र खरोखरी विचित्र झाली. कारण अबदर रझाक हा उलुघ बेगचा मुलगा, काबूलच्या सिंहासनाचा हक्कदार वारस व कांहीं दिवस त्या राज्यावर राजा म्हणून नांदलेला; तेव्हां त्यास ही संधि म्हणजे बेमालूम होतो. वडिलार्जित राज्य बाबुराने केवळ स्वतःचा जीव बचावण्यासाठी त्याच्या स्वाधीन केले होत व तो परागंदा झाला होता, तो माघारी येतो काय, राज्याची मागणी करतो काय व अबदर रझाक कोणत्याही प्रकारची खळखळ न करता ते त्याच्या स्वाधीन करतो काय हा सर्वच प्रकार मोठा गमतीचा वाटतो.